*हसोळ येथील मेजारीवाडी शिव मंडळातर्फे महाशिवरात्री उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*हसोळ येथील मेजारीवाडी शिव मंडळातर्फे महाशिवरात्री उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम*
*हसोळ येथील मेजारीवाडी शिव मंडळातर्फे महाशिवरात्री उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील मौजे हसोळ येथील मेजारीवाडी शिव मंदिरामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही रविवार दि.15 फेब्रुवारी 2026 रोजी भव्य महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात येणार आहे. रविवार दि 15 व सोमवार 16 या दोन दिवसांत आयोजित केलेल्या कार्यक्रमात दि. 15 रोजी स.7 ते 9 या वेळेत शिवलीलामृत अध्याय वाचन, स.10 ते 2 पुजा व लघुरुद्र (अभिषेक), सायं 4 ते 6.30 दिंडी प्रदक्षिणा, रात्री 7.30 ते 8.30 हरिपाठ, रात्री 9 वा. बुवा सौ योगिता परब पवार (देव केसरकर हनुमान प्रासादिक महिला भजन मंडळ वर्दे कुडाळ) विरुद्ध बुवा सौ. स्वराली नाटेकर (भेराई देवी प्रासादिक महिला भजन मंडळ, मोंड गावठाण वाडी ता. देवगड) यांचा डबलबारी भजनाचा जंगी सामना आयोजित करण्यात आला आहे. 16 रोजी स. 9 ते 11 पूजा व आरती, दु. 12.30 ते 2 महाप्रसाद, सायं 4 ते 6 या वेळेत हळदीकुंकू समारंभ, 6.30 ते रात्री 10 वाजेपर्यंत जि.प.पू. प्रा. केंद्रशाळा केळवली नं 3 व जि.प.पू. प्रा. शाळा मोरोशी नं 1 या शाळांमधील मुलांचे शैक्षणिक कार्यक्रम होणार आहेत. परिसरातील तसेच तालुक्यातील भक्त भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती मेजारीवाडी शिव मंडळ, हसोळ यांनी केली आहे.



