*डॉ.समिधा नटावदकर यांना राज्यस्तरीय शिवकन्या महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*डॉ.समिधा नटावदकर यांना राज्यस्तरीय शिवकन्या महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर*
*डॉ.समिधा नटावदकर यांना राज्यस्तरीय शिवकन्या महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर*
नंदूरबार(प्रतिनिधी):-शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे बहुउद्देशीय संस्था नाशिक या प्रतिष्ठित संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी शैक्षणिक, सामाजिक प्रशासकिय, आरोग्य, औद्योगिक क्षेत्रात विशेष व उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांना शिवकन्या महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यंदाचा हा राज्यस्तरीय प्रतिष्ठेचा पुरस्कार आरोग्य व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल नंदुरबार येथील रेवा फाउंडेशनच्या अध्यक्षा, सामाजिक कार्यकर्त्या व भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा तथा बालरोग तज्ञ डॉ.समिधा सुहास नटावदकर यांना घोषित झाला असून, फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महाकवी कालिदास नाट्यगृह नाशिक येथे हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडणार आहे. असे संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील यांनी पत्राद्वारे कळवले आहे. डॉ समिधा नटावदकर या रेवा फाउंडेशनच्या माध्यमातून विविध ठिकाणी आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, गरजूंना कपडे तथा जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, जनजागृतीपर व्याख्याने असे अनेक उपक्रम राबवित असतात.
त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.



