*कोकण कट्टा सन्मान सोहळ्यात कोकणातील मान्यवरांचा गौरव*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कोकण कट्टा सन्मान सोहळ्यात कोकणातील मान्यवरांचा गौरव*
*कोकण कट्टा सन्मान सोहळ्यात कोकणातील मान्यवरांचा गौरव*
मुंबई(प्रतिनिधी):-'कोकण कट्टा’ या संस्थेतर्फे ‘कोकण कट्टा सन्मान’ सोहळा नुकताच विलेपार्ले येथील दीनानाथ नाट्यगृहात पार पडला. यावेळी कोकणचा समृद्ध वारसा जपणाऱ्या आणि सामाजिक- सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना गौरविण्यात आले. ज्येष्ठ इतिहास अभ्यासक अप्पा परब, ‘महाराष्ट्र टाइम्स’चे वरिष्ठ पत्रकार हर्षल मळेकर, पार्ले टिळक विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका छाया गाडे, उद्योजक शेखर धारगळकर, कलाकार दीपन वर्तक, समाजसेवक महेश सावंत आणि संतोष परब यांना त्यांच्या कार्याबद्दल ‘कोकण सन्मान’ प्रदान करण्यात आला. ‘कोकण कट्टा’चे संस्थापक अजित पितळे, सेवाई संस्थेचे अध्यक्ष संदीप दळवी, जितेंद्र जानावळे आर्य मेलडीजचे संदीप पवार यांच्या हस्ते मान्यवरांचा कोकण निर्माते ऋषीं परशुरामाची आकर्षक मूर्ती सन्मान चिन्ह देऊन गौरव झाला. यावेळी आर्य मेलडीजचे संदीप पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘यादों का कारवां’ हा गाण्यांचा कार्यक्रम सादर केला. गायक श्रीकांत नारायण यांनी प्रेक्षकांना मोहून टाकलं यातून उभी राहिलेली रक्कम कर्करोगाच्या रुग्णांवरील उपचारांसाठी दिली जाणार आहे. कर्करोगावरील उपचारांसाठी मदतीचा धनादेश एका वाद्यवादकाला प्रदान करण्यात आला. विलेपार्ले अंधेरी विभागातील अनेक मान्यवर मंडळी कार्यक्रमाला उपस्थित होती. कोकण कट्टा सर्व सदस्यांनी अपार मेहनतीने हा कार्यक्रम यशस्वी केला.



