*आई जीवदानी चषक 2026 अंडरआर्म टर्फ क्रिकेट स्पर्धा (पर्व 1ले ) मोठ्या उत्साहात मान्यवर, स्पर्धक संघाच्या प्रतिसादात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आई जीवदानी चषक 2026 अंडरआर्म टर्फ क्रिकेट स्पर्धा (पर्व 1ले ) मोठ्या उत्साहात मान्यवर, स्पर्धक संघाच्या प्रतिसादात संपन्न*
*आई जीवदानी चषक 2026 अंडरआर्म टर्फ क्रिकेट स्पर्धा (पर्व 1ले ) मोठ्या उत्साहात मान्यवर, स्पर्धक संघाच्या प्रतिसादात संपन्न*
विरार(प्रतिनिधी):-आई जिवदानी भजन मंडळ विरार ते चर्चगेट,सकाळी 7.32 श्री. संत सेवा भजन सामाजिक संस्था (पश्चिम रेल्वे प्रवासी भजन महासंघ) संलग्न आई जीवदानी चषक 2026 अंडरआर्म टर्फ क्रिकेट स्पर्धा रविवार 1 फेब्रुवारी 2026 रोजी विविध संघाच्या सहभागात मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यक्रमाला श्री संत सेवा भजन सामाजिक संस्थेचे पदाधिकारी शिवाजी पाटील माऊली, विनोद चव्हाण माऊली, प्रेमनाथ गुरव, जीवन मोरे, दिपक धनावडे माऊली, सुनील कदम माऊली, सतीश ढगाळे, राजेंद्र दवंडे माऊली, सुरेश भेकरे माऊली, शिवाजी दादा भानत, प्रवीण जाधव, राजेंद्र धोपट, अरुणजी राणे माऊली, दीपेश शेडगे, राजेश भोसले (तुतारी वादक) गजस्कंध सोसायटी पदाधिकारी उपस्थित होते. या स्पर्धेत निमेश खेरटकर सामनावीर सामनावीर ओम साई भजन मंडळ, वैभव पांगळे उत्कृष्ट गोलंदाज ओम साई भजन मंडळ आकाश वनगुळे उत्कृष्ट फलंदाज विठ्ठल रखुमाई भजन मंडळ, शुभम राणे (MOS) मालिकावीर साई गणेश भजन मंडळ
विठ्ठल रखुमाई भजन मंडळ सांघिक तृतीय पारितोषिक, श्री साई गणेश भजन मंडळ सांघिक द्वितीय पारितोषिक, ओम साई भजन मंडळ (साई घाडी) सांघिक प्रथम पारितोषिक प्राप्त केली. क्रिकेट स्पर्धेला प्रथम पारितोषिक-राजेंद्र धोपट, अजित कांबळे, द्वितीय पारितोषिक- रामचंद्र कोतवडेकर, ह भ प नितेश आंबेकर, तृतीय पारितोषिक- निलेश रसाळ, चेंडू - नितीन रसाळ, मेडल- हरेश मांडवकर, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, सामनावीर, मालिकावीर - शैलेश माने, सन्मानचिन्ह- स्वप्नील सावंत, कृष्णा सुर्वे आणि तसेच विशेष आर्थिक पाठबळ मंडळातील सर्वच सभासदांनी देणगीदार स्वरूपात केले. त्याच बरोबर श्री जयराम पवार माऊली, सुरेश भेकरे माऊली, शिवाजी भानत, राजेंद्र अपराज माऊली यांचे मोलाचे सहकार्य लाभले. दिपक मांडवकर आणि तुषार मांडवकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
क्रिकेट समिती म्हणून कृष्णा सुर्वे, शशिकांत नाचणेकर, शैलेश माने, विनायक धावडे, गौरव नवाळे, विनायक भुवड, निलेश रसाळ, हरेश मांडवकर, समीर अपराज, क्रिकेट कॉमेन्ट्री प्रेमनाथ गुरव, अंकुश सकपाळ, महेश कदम, विक्रम कुडाळकर आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहिर नितीन रसाळ यांनी केले. या स्पर्धेचे आयोजन आई जिवदानी भजन मंडळाने केले होते उत्कृष्ट नियोजन असलेल्या या स्पर्धेला संघांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.



