*आजिवलीत क्रिडा स्पर्धा उत्साहात संपन्न, विविध तालुक्यातील 24 संघांचा सहभाग*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आजिवलीत क्रिडा स्पर्धा उत्साहात संपन्न, विविध तालुक्यातील 24 संघांचा सहभाग*
*आजिवलीत क्रिडा स्पर्धा उत्साहात संपन्न, विविध तालुक्यातील 24 संघांचा सहभाग*
राजापूर(प्रतिनिधी):-आजीवली बौद्ध विकास मंडळ मुंबई/ ग्रामीण आणि माता रमाई महिला मंडळ, आयोजक खतरनाक क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 24 ते 26 जानेवारी रोजी पर्व 5 संपन्न झाले या 3 दिवस चालू असलेल्या क्रीडा स्पर्धेत एकुण 24 संघ दाखल झाले, मुंबई, कोल्हापूर, संगमेश्वर, कुडाळ, गगनबाडा, वैभववाडी, कणकवली या ठिकाणावरून संघ आजीवलीमध्ये क्रिकेट स्पर्धेत सहभागी झाले या स्पर्धेचा विजेता संघ ठरला तो भगवती आंब्रड (कुडाळ), उपविजेता संघ बाप्पा मोरया (मुंबई), तृतीय क्रमांकचा मानकरी ठरला गांगो रवळनाथ (तिरवडे) तरी या तिन्ही संघाचे अभिनंदन करण्यात आले तसेच इतर संघांनी स्पर्धेत सहभाग घेऊन आम्हाला जे सहकार्य केले त्या बद्दल त्याचे ही आभार मानण्यात आले या स्पर्धेसाठी ग्रामीण मंडळ, महिला मंडळ, वाडीतील तरुण मुले, मुंबई वरून माजी कार्यकरणी याची उपस्थिती महत्वाचे योगदान लाभले त्याचे सुद्धा मनपूर्वक आभार, बक्षिस वितरणाचा सांगता कार्यक्रम यास खास उपस्थिती लाभली ती आमदार किरण सामंत यांची सुकन्या अपूर्वा सामंत यांची त्यांनी खरंच क्रिकेट बदल युवकांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले आणि शुभेच्या दिल्या आणि बक्षिस वितरणाचा सांगता समारोप करण्यात आला.



