*भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयामार्फत आयोजित राष्ट्रीय प्रशिक्षण, कार्यक्रमांतर्गत “रचनात्मक कठपुतलीची परंपरा तसेच शिक्षणात कठपुतलीचा सहभाग व अध्यापनातील महत्त्व”प्रशिक्षणासा
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयामार्फत आयोजित राष्ट्रीय प्रशिक्षण, कार्यक्रमांतर्गत “रचनात्मक कठपुतलीची परंपरा तसेच शिक्षणात कठपुतलीचा सहभाग व अध्यापनातील महत्त्व”प्रशिक्षणासा
*भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयामार्फत आयोजित राष्ट्रीय प्रशिक्षण, कार्यक्रमांतर्गत “रचनात्मक कठपुतलीची परंपरा तसेच शिक्षणात कठपुतलीचा सहभाग व अध्यापनातील महत्त्व”प्रशिक्षणासाठी नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षक गोपाल गावीत यांची निवड*
नंदुरबार(प्रतिनिधी):-भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयामार्फत आयोजित राष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत “रचनात्मक कठपुतलीची परंपरा तसेच शिक्षणात कठपुतलीचा सहभाग व अध्यापनातील महत्त्व” या विषयावरील प्रशिक्षणासाठी नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षक गोपाल गावीत यांची निवड झाली आहे.
हे प्रशिक्षण राजस्थान राज्यातील उदयपूर येथे 2 ते 6 फेब्रुवारी 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आले असून, याचे आदेश डॉ. राहुल कुमार, उपनिदेशक, सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांनी दिले आहेत. या राष्ट्रीय प्रशिक्षणासाठी देशातील 15 राज्यांमधून 142 शिक्षकांची निवड करण्यात आली असून, नंदुरबार जिल्ह्यातून गोपाल गावीत यांची एकमेव निवड झाली आहे.
गोपाल गावीत यांनी यापूर्वी सन 2018 मध्ये सांस्कृतिक प्रशिक्षण केंद्र, नवी दिल्ली येथे प्रशिक्षण घेतले असून, त्याआधारे शाळा स्तरावर विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. तसेच त्यांनी सीसीआरटी केंद्र हैदराबाद व गुवाहाटी (आसाम) येथेही प्रशिक्षण पूर्ण केले आहे. आजादी का अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत भारतीय स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानावर आधारित 25 यशोगाथा त्यांच्या लेखनातून सीसीआरटीच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध झाल्या आहेत. प्राथमिक शिक्षक गोपाल गावित तथा सीसीआरटी स्वयंसेवक यांनी आज़ादी का अमृत महोत्सव अंतर्गत राबविण्यात आलेल्या “हर घर तिरंगा” उपक्रमासह स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या बलिदानाच्या यशोगाथांवरील लेखन या विषयावर केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. गोपाल गावित यांनी आपल्या लेखनातून स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास, स्वातंत्र्यसैनिकांचे त्यागमय जीवन व देशभक्तीचे मूल्य प्रभावीपणे मांडले. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांसह समाजात देशप्रेमाची भावना बळकट झाली असून राष्ट्रीय जाणीव जागृत करण्यास मोलाची मदत झाली आहे.
शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असतानाच सांस्कृतिक व राष्ट्रीय उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. या उल्लेखनीय कार्याची दखल घेत नवी दिल्ली सीसीआरटी डॉ. राहुल कुमार, उपसंचालक (मूल्यांकन, फेलोशिप)
यांनी गोपाल गावीत प्राथमिक शिक्षक व सीसीआरटी स्वयंसेवक यांचे कौतुक केले आहे.
या निवडीबद्दल जिल्हा परिषद नंदुरबारचे शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे, नवापूरचे गटशिक्षणाधिकारी रमेश देसले, खांडबारा शिक्षण विस्तार अधिकारी शीलवंत वाकोडे, केंद्रप्रमुख प्रभू वळवी तसेच शिक्षकवृंदांनी अभिनंदन केले आहे.



