*मसूरकरवाडी, ओशिवळे येथे माघी गणेश जयंती उत्सवाचे औचित्य साधून भक्तिमय वातावरणात श्री साईबाबांच्या नवीन मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*मसूरकरवाडी, ओशिवळे येथे माघी गणेश जयंती उत्सवाचे औचित्य साधून भक्तिमय वातावरणात श्री साईबाबांच्या नवीन मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा*
*मसूरकरवाडी, ओशिवळे येथे माघी गणेश जयंती उत्सवाचे औचित्य साधून भक्तिमय वातावरणात श्री साईबाबांच्या नवीन मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा*
राजापूर(प्रतिनिधी):-मसूरकरवाडी, ओशिवळे येथील श्री साई गजानन मंदिरात माघी गणेश जयंती उत्सव भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. माघी गणेशोत्सवाच्या पावन शुभमुहूर्तावर श्री साईबाबांच्या नवीन मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. सकाळी धार्मिक विधींनी कार्यक्रमास सुरुवात झाली. वैदिक मंत्रोच्चार, अभिषेक, पूजन व आरतीच्या मंगल वातावरणात श्री साई-बाबांच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा विधी पार पडले. या वेळी संपूर्ण परिसर भक्तीरसात न्हाल्याचे चित्र पाहायला मिळाले. या सोहळ्यास मसूरकरवाडी, ओशिवळे तसेच परिसरातील वाडी -वस्तीतील भाविकांनी उपस्थिती लावली. महिला, पुरुष, युवक व बालगोपाल भाविकांनी श्री साईबाबांचे दर्शन घेत गणरायाच्या चरणी मनोभावे प्रार्थना केली.
मसूरकरवाडी, ग्रामस्थ विकास मंडळ, ओशिवळे यांच्या वतीने माघी गणेश जयंती उत्सवाचे सुयोग्य नियोजन करण्यात आले होते. ग्रामस्थांचे सहकार्य आणि शांततापूर्ण नियोजनामुळे कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. कार्यक्रमानंतर उपस्थित भाविकांना तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घेतला. या धार्मिक सोहळ्यामुळे परिसरात अध्यात्मिक वातावरण निर्माण झाले असून सामाजिक ऐक्य आणि भक्तीभाव अधिक दृढ झाल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली. सायं. श्री गणेश आणि श्री साईबाबांच्या महा- आरती आणि वाडीतील वारकरी भजनाच्या गजराने दिवसभराच्या कार्यक्रमांची मनोभावे सांगता करण्यात आली.



