*आई फोक्राई देवी क्रिकेट संघ निनावे (नारकरवाडी) आयोजित भव्य ओव्हरआर्म टेनिस क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आई फोक्राई देवी क्रिकेट संघ निनावे (नारकरवाडी) आयोजित भव्य ओव्हरआर्म टेनिस क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न*
*आई फोक्राई देवी क्रिकेट संघ निनावे (नारकरवाडी) आयोजित भव्य ओव्हरआर्म टेनिस क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न*
विरार(प्रतिनिधी):-मधील मनवेलपाडा खदानी मैदान येथे आई फोक्राई देवी क्रिकेट संघ यांच्या वतीने तसेच (मार्लेश्वर पंचक्रोशी क्रिकेट समिती, मुंबई संलग्न) भव्य ओव्हरआर्म टेनिस क्रिकेट स्पर्धा 2026 यशस्वीरीत्या पार पडली. स्पर्धेचे उद्घाटनप्रभाकर नारकर आणि विश्राम नारकर गावचे जेष्ठ नागरिक गावावरून आले होते त्यांच्या हस्ते करण्यात आले.
या स्पर्धेला परिसरातील विविध संघांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सर्व सहभागी संघ वेळेत उपस्थित राहून खेळाडूंनी शिस्तबद्ध व क्रीडावृत्तीने खेळ सादर केला. त्यामुळे ही स्पर्धा नियोजित वेळेनुसार सायंकाळी ठीक 6 वाजता बक्षीस वितरण सोहळ्यासह उत्साहात पार पडली. या स्पर्धेत प्रथम क्रमांक – हिरादेवी निवधे, द्वितीय क्रमांक – हातीव इलेव्हन, तृतीय क्रमांक – आर. के. वॉरियर्स निवधे, चतुर्थ क्रमांक शिंब्रादेवी विठ्ठल रखुमाई क्रिकेट संघ, ओझरे,
वैयक्तिक पुरस्कार :
उत्कृष्ट फलंदाज – आकाश (हिरादेवी निवधे), उत्कृष्ट गोलंदाज राजेंद्र (हातीव इलेव्हन),
उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अक्षय (हातीव इलेव्हन),
मालिकावीर (Man of the Series) नरेंद्र (हिरादेवी निवधे) या स्पर्धेतील सर्व विजेते व सहभागी संघांचे आयोजकांच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. तसेच प्रत्येक खेळाडू, कर्णधार, पंचक्रोशी समितीचे पदाधिकारी, पंच, तसेच मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या प्रेक्षकांचे आयोजकांनी आभार मानले. आई फोक्राई देवी क्रिकेट संघ, निनावे (नारकरवाडी) मधील समस्त मुंबईकर ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभल्याबद्दल त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करण्यात आले.



