*नंदुरबार येथील महेंद्रा पब्लिक स्कूलमध्ये ‘SPRINT’ वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न, क्रीडेतून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास–मान्यवरांचे प्रतिपादन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार येथील महेंद्रा पब्लिक स्कूलमध्ये ‘SPRINT’ वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न, क्रीडेतून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास–मान्यवरांचे प्रतिपादन*
*नंदुरबार येथील महेंद्रा पब्लिक स्कूलमध्ये ‘SPRINT’ वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न, क्रीडेतून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास–मान्यवरांचे प्रतिपादन*
नंदूरबार(प्रतिनिधी):-आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ शैक्षणिक प्रगती पुरेशी नसून विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकासासाठी क्रीडा अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन मान्यवरांनी केले. ही भावना नंदुरबार येथील महेंद्रा पब्लिक स्कूल येथे आयोजित करण्यात आलेल्या. ‘SPRINT’ वार्षिक क्रीडा महोत्सवात व्यक्त करण्यात आली. दिनांक 29, 30 व 31 जानेवारी रोजी आयोजित या तीन दिवसीय क्रीडा महोत्सवाचा 31 जानेवारी रोजी उत्साहपूर्ण वातावरणात समारोप करण्यात आला. क्रीडा महोत्सवाची सुरुवात हाऊस मार्चपास्टने करण्यात आली. विविध हाऊसच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने केलेल्या मार्चपास्टने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या क्रीडा महोत्सवात एरिअल सिल्क, मल्लखांब, जिम्नॅस्टिक, भालाफेक (Javelin Throw), डिस्कस थ्रो, शॉटपुट तसेच विविध आउटडोअर व इनडोअर क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. या सर्व स्पर्धांमध्ये 350 हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपली क्रीडाकौशल्ये सादर केली. स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 400 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना पदके व प्रशस्तीपत्रे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास व आनंद स्पष्टपणे दिसून आला. क्रीडा महोत्सवाच्या समारोपप्रसंगी प्ले ग्रुप ते इयत्ता 9 वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्याविष्काराने कार्यक्रमाला सांस्कृतिक रंगत आणली. क्रीडा व कला यांचा सुंदर संगम या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाला. या क्रीडा महोत्सवाचे मुख्य आकर्षण ‘एरिअल सिल्क’ ठरले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या साहसी व कौशल्यपूर्ण एरिअल सिल्क प्रात्यक्षिकाला उपस्थितांनी विशेष दाद दिली. या कार्यक्रमास डॉ. रोशन भंडारी, नीरज निराला, पीटीए अध्यक्ष जयेश जैन, शाळेचे चेअरमन केतन शाह, संचालिका पिनल शाह यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच सल्लागार समिती सदस्य सुनील पाटील, धर्मेंद्र चिकारा, निलेश पाटील, निलेश शाह, आकाश बेदमुथा, शांकी जैन व शाळेचे प्राचार्य अरुण पाटील पीटीएचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याशिवाय पालकांची लक्षणीय उपस्थिती कार्यक्रमाच्या यशात मोलाची ठरली. शाळा प्रशासनाने क्रीडेला दिलेले महत्त्व, उत्कृष्ट नियोजन व विद्यार्थ्यांचा उत्साह यामुळे ‘SPRINT’ क्रीडा महोत्सव यशस्वी ठरला. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संघभावना, नेतृत्वगुण व आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.



