*नंदुरबार जिल्ह्यात “स्मार्ट फार्मासिस्ट 2.0+” कोर्सला उत्स्फूर्त प्रतिसाद एम एस पी सी समन्वयक डॉ. पंकज एम चौधरी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार जिल्ह्यात “स्मार्ट फार्मासिस्ट 2.0+” कोर्सला उत्स्फूर्त प्रतिसाद एम एस पी सी समन्वयक डॉ. पंकज एम चौधरी*
*नंदुरबार जिल्ह्यात “स्मार्ट फार्मासिस्ट 2.0+” कोर्सला उत्स्फूर्त प्रतिसाद एम एस पी सी समन्वयक डॉ. पंकज एम चौधरी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्ह्यातील फार्मासिस्ट बंधू-भगिनींनी फार्मसी मॅनेजमेंट कोर्सला दिलेल्या भरघोस प्रतिसादानंतर, त्याही पुढे एक पाऊल टाकत अत्याधुनिक व व्यावसायिकदृष्ट्या उपयुक्त असा “स्मार्ट फार्मासिस्ट 2.0+” हा विशेष कोर्स यशस्वीरीत्या पार पडला. हा कोर्स आप्पासाहेब शिंदे यांच्या संकल्पनेतून सक्षम व आधुनिक फार्मासिस्ट घडविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिलच्या औषध माहिती केंद्र (DIC) यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. हा उपक्रम फक्त नोंदणीकृत फार्मासिस्टसाठी राबविण्यात आला.
दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी हिरा एक्झिक्यूटिव्ह हॉटेल येथे झालेल्या या प्रशिक्षण शिबिरात ग्रामीण भाग व नंदुरबार शहरातील एकूण 50 फार्मासिस्टांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कोर्सच्या पहिल्या सत्रात बनसोड सर यांनी मूत्रपिंड विकार (Renal Impairment) या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. यामध्ये औषधांच्या डोस समायोजनाची ओळख, रेड फ्लॅग लक्षणे ओळखणे, तसेच रुग्ण फॉलो-अपमध्ये फार्मासिस्टची महत्त्वपूर्ण भूमिका याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. याच सत्रात पोषण (Nutrition) या विषयावर आवश्यक पोषक घटक, सप्लिमेंट्सची माहिती तसेच ओटीसी न्यूट्रास्युटिकल्स सुचविताना फार्मासिस्टची भूमिका यावर उपयुक्त मार्गदर्शन करण्यात आले.
दुसऱ्या सत्रात डॉक्टर प्रशांत आरगडे यांनी किडनी स्मार्ट या विषयावर सखोल व अत्यंत महत्त्वाचे मार्गदर्शन केले. किडनी वरील आजार यावर सविस्तर अवलोकन, रुग्ण सल्ला, सुरक्षित औषध वापर आणि रुग्ण फॉलो- अपमध्ये फार्मासिस्टची भूमिका त्यांनी प्रभावीपणे समजावून सांगितली.
या कोर्समुळे सहभागी फार्मासिस्टांना व्यावसायिक स्पर्धेत अधिक सक्षम व अद्ययावत होण्याची संधी मिळाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिलचे समन्वयक प्राचार्य डॉ. पंकज चौधरी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात भविष्यातही संघटनेच्या वतीने अशाच प्रकारचे उपयुक्त व व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाचे प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार असून, त्याचा लाभ सर्व सभासदांनी घ्यावा, असे आवाहन केले. यावेळी नंदुरबार जिल्हा केमिस्ट & ड्रगिस्ट असोसिएशनचे कोषाध्यक्ष दिनेश जैन जिल्हा कार्यकारणी सदस्य देवेंद्र गुरव, विवेक बच्छाव, सहाजेब सय्यद नंदुरबार तालुका अध्यक्ष महेश राजपूत, तळोदा तालुका अध्यक्ष नचिकेत पिंप्रे, सौरभ माळी, नितीन मगरे, भावेश कोळी, अतुल अहिरराव व मोठया संख्येने केमिस्ट उपस्थित होते.



