*सेवापुर्तीच्या दिवशीच सर्व सेवाविषयक लाभासाठी प्रशासनाचा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू-मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सेवापुर्तीच्या दिवशीच सर्व सेवाविषयक लाभासाठी प्रशासनाचा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू-मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल*
*सेवापुर्तीच्या दिवशीच सर्व सेवाविषयक लाभासाठी प्रशासनाचा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू-मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्हा परिषद प्रशासनाच्या विविध विभागात सेवा देऊन सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा योग्यरित्या सन्मान व्हावा व कर्मचारी सेवानिवृत्त ज्या दिवशी होईल त्याच दिवशी त्याला सेवाविषयक सर्व लाभ सेवापुर्तीच्या दिवशीच मिळावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून जिल्हा प्रशासनामार्फत सेवानिवृत्त कर्मचारी यांचा सत्कार समारंभाच्या नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी केले. जिल्हा परिषदेच्या याहा मोगी सभागृहात जिल्हा परिषद, नंदुरबार अंतर्गत विविध विभागात वर्ग -3 व वर्ग -4 या पदावर कार्यरत व जानेवारीअखेर सेवानिवृत्त कर्मचारी यांचा सन्मान करणेसाठी सामान्य प्रशासन विभागामार्फत सत्कार सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या संकल्पनेतून या नावीन्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा प्रशासनात वर्ग 2 वर्ग 3 चे कर्मचारी हे आपल्या आयुष्यातील 30 ते 35 वर्षे आप- आपल्या परीने सेवा देतात. यामुळे सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचारी यांना जिल्हा प्रशासनाने सन्मानपूर्वक निरोप देणे हे जिल्हा प्रशासनाचे कर्तव्य आहे याच कर्तव्य् भावनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे ही गोयल यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश मोरे, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी उदयकुमार कुसुरकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण देवरे, शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे आदीसह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश मोरे यांनी केले.यावेळी सेवानिवृत्त झालेले केंद्रप्रमुख श्रीमती ललिता भामरे, मुख्याध्यापक प्रभाकर ठाकरे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यादव मोरे, प्राथमिक शिक्षक साहेबराव रजाळे, पंतू गावित, नरेंद्र कुवर, राजाराम पाटील, श्रीमती सुरेखा सोनवणे, मानसिंग वळवी, श्रीमती ललिता पावरा, वरिष्ठ सहाय्यक रतिलाल चौरे, रतिलाल गावित यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, शाल, वृक्षाचे रोप देऊन सन्मान करण्यात आला. तसेच सेवापुर्ती निमित्त कर्मचाऱ्यांना मिळणारे सर्व सेवा विषयक लाभाबाबतचे आदेश देण्यात आले. यावेळी केंद्रप्रमुख श्रीमती ललिता भामरे व शिक्षक पंतू गावित यांनी आपले मनोगत व्यक्त करून जिल्हा परिषद प्रशासनाच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रशासनाने कर्मचाऱ्यांनी केलेल्या सेवेची दखल घेऊन त्यांचा सन्मान केला. यामुळे कर्मचाऱ्यांच्या वतीने जिल्हा प्रशासनाने सुरू केलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक करून सेवापुर्तीनंतर मिळणाऱ्या सेवाविषयक लाभांमुळे कर्मचाऱ्यांची होणारी फिर- फिर थांबणार आहे. सर्व सेवा विषयक लाभाबाबतचे आदेश तात्काळ मिळाल्याने निवृत्तीवेतन सुरू होणार असल्याने प्रशासनाविषयी कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार सुनिल पाटील यांनी केले.



