*भोनगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी उषा पाटील यांची बिनविरोध निवड*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*भोनगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी उषा पाटील यांची बिनविरोध निवड*
*भोनगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी उषा पाटील यांची बिनविरोध निवड*
साक्री(प्रतिनिधी):-तालुक्यातील भोनगाव येथील ग्रामपंचायतचे उपसरपंच पदासाठी झालेल्या विशेष निवडीत उषा पाटील यांची बहुमताने बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत आणि फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा केला. ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला सरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. उपसरपंच पदासाठी उषा पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. विकासाला प्राधान्य देण्याचा निर्धार निवडीनंतर सत्काराला उत्तर देताना उषा पाटील म्हणाल्या की, "ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहीन. रस्ते, पाणी आणि स्वच्छता या मूलभूत सुविधांसह महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न करणार आहे. सर्व सदस्यांना सोबत घेऊन गावाचा सर्वांगीण विकास साधणे हेच माझे मुख्य ध्येय असेल."यावेळी सरपंच नाना सोनवणे, ग्रामविकास अधिकारी स्मिता तोरवणे, माजी उपस



