*प्रभू श्री.विश्वकर्मा भगवान जन्मोत्सव उत्साहात साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*प्रभू श्री.विश्वकर्मा भगवान जन्मोत्सव उत्साहात साजरा*
*प्रभू श्री.विश्वकर्मा भगवान जन्मोत्सव उत्साहात साजरा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नवयुग श्री विश्वकर्मा समाज मंडळ, नंदुरबारतर्फे सालाबादप्रमाणे यंदाही प्रभु श्री. विश्वकर्मा भगवान जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. श्री. विश्वकर्मा मंदिर, भोणे फाटा, नंदुरबार येथे सत्यनारायणाची महापूजा झाली. त्यानंतर प्रभू श्री. विश्वकर्मा यांचा मूर्तीस मान्यवर यांचा हस्ते पुष्पहार अर्पण करून महाआरतीचे आयोजन करण्यात आले. श्री. विश्वकर्मा मंदिर येथील सभामंडपात महिला भगिनी करीता हळदी कुंकू कार्यक्रम व भेटवस्तू वाटप कार्यक्रम आयोजन करण्यात येऊन त्यात महिलांचाही लक्षणीय सहभाग होता. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात येऊन समस्त समाजबांधव सह असंख्य दर्शनार्थी यांनी महाप्रसादाचे लाभ घेतला. प्रभू श्री. विश्वकर्मा भगवान जन्मोत्सव संध्येलाही श्री. विश्वकर्मा भगवान यांची महाआरती विधानपरिषद सदस्य आ. चंद्रकांत रघुवंशी यांचा शुभहस्ते पार पडली या प्रसंगी नगरसेवक कुणाल वसावे, भरत चौधरी, मोहित राजपूत यासह बहुसंख्य समाजबांधव उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वितेसाठी नवयुग श्री. विश्वकर्मा सुतार समाज मंडळ व प्रभू श्री. विश्वकर्मा जनोत्सव समिती, नंदुरबार अध्यक्ष अमित देवरे, उपाध्यक्ष दादाभाई मिस्तरी, सचिव पुष्कर सूर्यवंशी, कार्याध्यक्ष मुकेश सूर्यवंशी, खजिनदार हिरामण हिरे, सहसचिव हर्षल खैरनार, प्रसिद्धी प्रमुख पंढरीनाथ सुतार सह कार्यकारणी सदस्य सर्वश्री. सुनील बोरसे, युवराज कुवर, मनोहर जगताप, चेतन सोनवणे, सुर्यकांत खैरनार, शैलेंद्र देवरे, हरीश सूर्यवंशी, विजय खारकर, भूषण गवळे, प्रल्हाद बोरसे, दिनेश खैरनार, अविनाश कापडी, संतोष जगताप, हितेश हिरे, कार्यक्रमास ज्येष्ठ सल्लागार म्हणून वाल्मीक मिस्तरी, आत्माराम मिस्तरी, हिरालाल गवळे, वसंत मिस्तरी, कन्हैया जगताप, सुभाष सूर्यवंशी, नामदेव सूर्यवंशी, शिवाजी मिस्तरी, प्रकाश सूर्यवंशी, दौलत सूर्यवंशी यांचासह आदी. यांनी परिश्रम घेतले.



