*लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय जम्परोप स्पर्धेत एम. के. डी. कॉलेजच्या चंद्रकांत राजू कोकणी यांचा द्वितीय क्रमांक*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय जम्परोप स्पर्धेत एम. के. डी. कॉलेजच्या चंद्रकांत राजू कोकणी यांचा द्वितीय क्रमांक*
*लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय जम्परोप स्पर्धेत एम. के. डी. कॉलेजच्या चंद्रकांत राजू कोकणी यांचा द्वितीय क्रमांक*
नंदूरबार(प्रतिनिधी):-2 फेब्रुवारी 2026 ते 3 फेब्रुवारी 2026 लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय जम्परोप स्पर्धेत एम. के. डी. कॉलेजच्या चंद्रकांत राजू कोकणी यांचा द्वितीय क्रमांक लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय जम्परोप स्पर्धेत एम. के. डी. कॉलेज, नंदुरबार येथील विद्यार्थी चंद्रकांत राजू कोकणी यांनी उत्कृष्ट कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला आणि शाळेच्या नावलौकिकात मानाची भर घातली. या प्रतिष्ठित स्पर्धेत महाराष्ट्रातील कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनग अमरावती आणि नागपूर अशा प्रमुख विभागांसह राज्यातील विविध विभागांनी सहभाग घेतला होता. चंद्रकांत राजू कोकणी यांनी आपले कौशल्य, सातत्य आणि मेहनतीचे दर्शन घडवत द्वितीय क्रमांक मिळवला.
या उल्लेखनीय यशाबद्दल एस. एम. के. डी. एज्युकेशन सोसायटी, नंदुरबारचे चेअरमन श्री. शुभम किशोर दराडे, प्रशासकीय अधिकारी सचिन भोंगळे तसेच शाळेचे प्राचार्य जिनेश के. यू. यांनी विद्यार्थ्याचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या यशामागे शाळेच्या क्रीडा शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रशांत शिंदे, चंद्रकांत बारस्कर, योगेश मोरे आणि जगदीश जाधव यांच्या सातत्यपूर्ण प्रशिक्षणामुळेच हा यशाचा टप्पा गाठता आला, अशी भावना विद्यार्थ्याने व्यक्त केली. चंद्रकांत राजू कोकणी यांच्या या कामगिरीमुळे शाळेत आनंदाचे वातावरण असून, भविष्यात तो राज्य व राष्ट्रीय स्तरावर आणखी उज्ज्वल कामगिरी करेल, असा विश्वास शाळा प्रशासनाने व्यक्त केला आहे.



