*शालिनी जयंत नटावदकर प्राथमिक विद्यामंदिरात विज्ञान प्रदर्शनात 120 उपकरणे सादर* नंदुरबार(प्रतिनिधी):- येथील शा. ज. नटावदकर प्राथमिक विद्यामंदिरात शाळांतर्गत विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले.
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शालिनी जयंत नटावदकर प्राथमिक विद्यामंदिरात विज्ञान प्रदर्शनात 120 उपकरणे सादर* नंदुरबार(प्रतिनिधी):- येथील शा. ज. नटावदकर प्राथमिक विद्यामंदिरात शाळांतर्गत विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले.
*शालिनी जयंत नटावदकर प्राथमिक विद्यामंदिरात विज्ञान प्रदर्शनात 120 उपकरणे सादर*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील शा. ज. नटावदकर प्राथमिक विद्यामंदिरात शाळांतर्गत विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनात एकूण 120 उपकरणे सादर केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सुनील खैरनार होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. मिलिंद वडनगरे, तसेच एस. के.चौधरी, पी.जी. चौधरी, नितीन पाटील लाभले. परीक्षक म्हणून एकलव्य विद्यालयाच्या शिक्षिका जयश्री खैरनार व योगेश पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सी. व्ही.रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी बनवलेल्या उपकरणांचे परीक्षकांनी निरीक्षण करून त्यात इयत्ता पहिली व दुसरी, तिसरी व चौथी या दोन गटातून प्रत्येकी तीन क्रमांक तसेच उत्तेजनार्थ क्रमांक काढण्यात आले. त्यात पहिली व दुसरी गटातून प्रथम - श्रेया प्रकाश भिसे(1ली ब - जलशुद्धीकरण उपकरण), द्वितीय- नकुल नितीन त्रिकाळ (1ली ब - वैज्ञानिक खेळणी), तृतीय 1ली, इशिका अजय चौधरी 2री, अ - नंबर पार्क), शौर्य संतोष जाधव (1ली ड - वैज्ञानिक उपकरण ), उत्तेजनार्थ, वेदांत नितीन पाटील(1ली क - गमतीशीर गणित), भाग्येश राजेंद्र पाटील(1ली -क कानाची संरचना) 3) रितिका प्रदीप गावित-( 2री ब गणितीय मॉडेल) तिसरी व चौथी या गटातून प्रथम
भार्गवी नितीन पाटील(4थी ड - चोरी इशारा यंत्र), द्वितीय श्रिया अरुण कुमार कोकणी, ओम कल्याण दुबे, प्राची सुभाष भास्करे (4थी क - आधुनिक शेती व अवजारे), तृतीय 1) विधी किरण डेहनकर व राजवी राहुल भावसार(3री -ड ऊर्जेचे स्त्रोत, आदित्य गजानन ब्राह्मणे (4थी अ - फायर अलार्म), उत्तेजनार्थ 1) सोमेश्वरी दीपक शिरसाठ 4थी ड ( वैज्ञानिक खेळणी), 2) तनिष्का कांतीलाल वसावे (4 थी क - वैज्ञानिक खेळणी). या उपकरणांचा क्रमांक आला. विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन तरुलता कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पुनम बागुल यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.



