*स्वर्गीय अजित पवार यांचा अस्थिकलश 3 फेब्रुवारी रोजी नंदुरबारात,जिल्हावासीयांना घेता येणार दर्शन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*स्वर्गीय अजित पवार यांचा अस्थिकलश 3 फेब्रुवारी रोजी नंदुरबारात,जिल्हावासीयांना घेता येणार दर्शन*
*स्वर्गीय अजित पवार यांचा अस्थिकलश 3 फेब्रुवारी रोजी नंदुरबारात,जिल्हावासीयांना घेता येणार दर्शन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते स्व.अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले आहे. सर्वसामान्यांपासून राजकीय, सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रातून त्यांच्या जाण्याबद्दल तीव्र हळहळ व्यक्त केली जात असताना मंगळवार 3 फेब्रुवारी रोजी त्यांचा अस्थिकलश नंदुरबार येथे दाखल होणार आहे. स्व.अजित पवार यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांसाठी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्यालयात, (गिरीविहार गेट समोर,नंदुरबार) येथे व्यवस्था करण्यात आली आहे. या कालावधीत सर्वसामान्य नागरिक, कार्यकर्ते, पदाधिकारी व चाहत्यांना दर्शन घेता येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांनी दिली आहे. स्व. अजित पवार हे नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रवादी चळवळीचा कणा होते. संघटनात्मक बांधणी, कार्यकर्त्यांशी असलेली आपुलकी, स्पष्टवक्तेपणा आणि जनहितासाठीची त्यांची भूमिका यामुळे सर्वत्र आपला ठसा उमटविला होता. त्यांच्या जाण्याने एक अनुभवी, अभ्यासू आणि लोकाभिमुख नेता गमावल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. अजित पवार यांचा अस्थिकलश नंदुरबारात दाखल होणार असल्याने जिल्ह्यातील वातावरण शोकमय झाले असून, अनेक कार्यकर्ते भावनिक झाले आहेत. यासंदर्भात माहिती देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांनी नागरिकांनी शांतता व शिस्त पाळून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. स्व.अजित पावर यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी नंदुरबारमध्ये मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.



