*नंदुरबारमध्ये जी. टी. पाटील महाविद्यालयात 'CABFF-2026' राज्यस्तरीय परिषद संपन्न; जैवविविधतेतील नवीन प्रवाहावर मंथन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबारमध्ये जी. टी. पाटील महाविद्यालयात 'CABFF-2026' राज्यस्तरीय परिषद संपन्न; जैवविविधतेतील नवीन प्रवाहावर मंथन*
*नंदुरबारमध्ये जी. टी. पाटील महाविद्यालयात 'CABFF-2026' राज्यस्तरीय परिषद संपन्न; जैवविविधतेतील नवीन प्रवाहावर मंथन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित, जी. टी. पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, संशोधन आणि पदव्युत्तर विभाग प्राणीशास्त्र व वनस्पतीशास्त्र यांच्या संयुक्त विद्यमाने 'Current Advancement in Biodiversity of Flora and Fauna' (CABFF-2026) या विषयावर एक दिवसीय राज्यस्तरीय बहुविद्याशाखीय परिषदेचे दिमाखात आयोजन करण्यात आले. 'PM-USHA' (Soft Component) अंतर्गत पुरस्कृत असलेल्या या परिषदेत जैवविविधतेतील आधुनिक बदलांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या परिषदेचे उद्घाटन प्रा. एस. टी. इंगळे (प्र- कुलगुरू, क.ब.चौ. उ.म.वि., जळगाव) यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य आणि व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. एम. जे. रघुवंशी होते.
तर अतिथी म्हणून नंदुरबार तालुका विधायक समितीचे समन्वयक डॉ. एम. एस. रघुवंशी उपस्थित होते.
त्यासोबत तज्ज्ञ मार्गदर्शकांचे सत्र (Resource Persons) पार पडले यात
परिषदेच्या विविध सत्रांमध्ये राज्यातील आणि राज्याबाहेरील तज्ज्ञांनी आपले विचार मांडले. यात प्रामुख्याने:
प्रा. के. एस. राजपूत (बडोदा विद्यापीठ)
डॉ. व्ही. पी. एस. शेखावत (मुंबई विद्यापीठ)
डॉ. एस. बी. वाघमारे (पुणे विद्यापीठ)
डॉ. भाऊराव चौशेट्टे, सेल्युला रिसर्च फौंडेशन (छत्रपती संभाजीनगर)
यांनी वनस्पती आणि प्राणिजगतातील जैवविविधता आणि त्यातील संशोधनाच्या संधी यावर प्रकाश टाकला. परिषदेचे महत्त्व नंदुरबार सारख्या आदिवासी बहुल आणि निसर्ग संपन्न जिल्ह्यात 'फ्लोरा अँड फॉना' (Flora and Fauna) या विषयावर झालेली ही परिषद संशोधकांसाठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. या परिषदेत 175 प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी आणि निसर्गप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले, समारोप उप प्राचार्य डॉ संदीप पाटील यांनी केले, परिषदेच्या यशस्वीते साठी निमंत्रक, डॉ प्रेम कुमार गौतम, सचिव, डॉ गोविंद बळदे यांनी काम बघितले, सूत्रसंचालन डॉ माधव कदम आणि डॉ डी एस पाटील यांनी केले आणि प्रा संदीप बडगुजर, प्रा जे सी पाटील, प्रा जयश्री नायका, प्रा वैशाली मराठे, डॉ संगीता पिंपरे, डॉ स्वप्नील मिश्रा, डॉ प्रफुल्ल पाटील, डॉ व्ही झेड चौधरी, डॉ तारक दास, प्रा केशव परदेशी, प्रा बी बी चौधरी, प्रा योगेश मराठे, डॉ अनिल कुलकर्णी, डॉ जी आर गुप्ता, डॉ महेंद्र पाटील,डॉ संदिप मराठे, प्रा आशिष वाघ, प्रा सचिन आढाव यांनी परिश्रम घेतले.



