*नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित, साधना विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, शनिमांडळ तालुका जिल्हा नंदुरबार येथील विद्यार्थी झाले मोठे व्यावसायिक*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित, साधना विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, शनिमांडळ तालुका जिल्हा नंदुरबार येथील विद्यार्थी झाले मोठे व्यावसायिक*
*नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित, साधना विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, शनिमांडळ तालुका जिल्हा नंदुरबार येथील विद्यार्थी झाले मोठे व्यावसायिक*
नंदुरबार(प्रतिनिधी):-साधना विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शनिमांडळ येथील मुख्याध्यापक तथा प्राचार्य कुंदन पाटील व पर्यवेक्षक पि यू आव्हाड यांच्या मार्गदर्शनाने व विद्यालयातील सांस्कृतिक मंडळ प्रमुख किरण मोरे यांच्यासह सर्व सहकारी बंधू- भगिनींनी आनंद बाजाराचे आयोजन केले. यावेळी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सर्वे प्रकाराचे खाद्यपदार्थ स्वतः तयार करून स्टॉलची चांगल्या प्रकारे मांडणी करून स्टॉलला दुकानाचे नाव, खाद्यपदार्थाचे चित्र काढून व किंमत टाकून दुकान चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांनी सजवली होती. स्वच्छतेसाठी दुकान चालकाने विशेष लक्ष दिले होते. यावेळेस विद्यालयाच्या वतीने शनिमांडळ पंचक्रोशी तील प्रमुख मंडळींना आमंत्रित केले होते.
कारण विद्यार्थ्यांचा या खाद्यपदार्थाच्या विक्रीसाठी महत्त्व यावं व ग्रामस्थांनी अशाच प्रकाराचे व्यवसायाला विद्यार्थ्यांना चालना द्यावी यामुळे पंचक्रोशीतील सर्व नेते, प्रमुख, विविध संघटनेचे आजी माजी पदाधिकाऱ्यांना बोलावून त्यांच्या हस्ते या आनंद बाजाराचे उद्घाटन करण्यात आले होते. कार्यक्रमा वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती डॉक्टर सयाजीराव मोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून व कार्यक्रम बघून भविष्यात शनिमांडळ येथे मोठे व्यावसायिक दृष्ट्या एक व्यावसायिक क्षेत्र निर्माण होईल असे विद्यार्थ्यांचे उत्साह बघून त्यांना वाटू लागले व त्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा ही दिल्या.
या शैक्षणिक उपक्रमात सहभाग घेतलेले सर्व व्यावसायिक विद्यार्थ्यांना काहींना नफा झाला काही ना तोटा झाला पण या सर्व उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना खूप आनंद मिळाला व व्यवसायाचे धडे शिकायला मिळाले.



