*विमानतळ रोड गार्डनसाठी खा. रवींद्र चव्हाण यांचा पाच लाखाचा निधी आनंद कल्याणकर यांच्या आंदोलनास पाठिंबा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*विमानतळ रोड गार्डनसाठी खा. रवींद्र चव्हाण यांचा पाच लाखाचा निधी आनंद कल्याणकर यांच्या आंदोलनास पाठिंबा*
*विमानतळ रोड गार्डनसाठी खा. रवींद्र चव्हाण यांचा पाच लाखाचा निधी आनंद कल्याणकर यांच्या आंदोलनास पाठिंबा*
नांदेड(प्रतिनिधी):-विमानतळ रोड गार्डनसाठी खा. रवींद्र चव्हाण यांनी पाच लाखाचा निधी देण्याची घोषणा केली असून या गार्डनच्या सर्वांगीन विकासासाठी आनंद कल्याणकर यांनी सुरू केलेल्या आंदोलनास त्यांनी पाठिंबा दिला. काल शुक्रवारी महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्य पत्रकार आनंद कल्याणकर यांनी गार्डनच्या पार्किंग परिसरात एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. या उपोषण गार्डन विकास प्रेमी नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. या उपोषणात आसना वाॅकींग ग्रुपचे सदस्य सर्वश्री दिगंबर क्षिरसागर, प्रा. जगदिश कदम, शिवाजी धूमाळे, वामन हंबर्डे, निवृती कोकाटे, प्रल्हाद जाधव, निळकंट पत्तेवार, भगवान अंजनीकर, निर्मलकुमार सूर्यवंशी, संदिप प्रकाश देशमुख, शामसुंदर देशमुख तरोडेकर, सुर्यवंशी तळणीकर, कुलकर्णी, विजय कुमार पुयड यांच्या सह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या लाक्षणिक उपोषणास न
खासदार रविंद्र चव्हाण आणि जिल्हा काँग्रेस कमेटीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाठींबा जाहिर केला. खासदार रविंद्र चव्हाण यांनी विमानतळ रोड गार्डनच्या सिंचनासाठी विंधन विहीर तसेच गार्डन मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी पाच लाख रुपयांचा निधी जाहीर केला. आरोग्याच्या दृष्टीने नांदेड शहयातील सर्व गार्डनची दुरूस्ती करून पुनर्जीवन करावे असे खासदार चव्हाण म्हणाले. यावेळी काँग्रेसचे दक्षिण जिल्हाध्यक्ष हणमंत पाटील बेटमोगरेकर, ऊतरचे जिल्हाध्यक्ष राजेश पावडे, महेश देशमुख तरोडेकर, आनंद चव्हाण, सुरेंद्र घोडजकर, नगरसेवक सत्यपाल सावंत, तरोडा बुद्रुकच्या नगरसेवक सुनिता रूपक जोंधळे, आदि उपस्थित होते. कल्याणकर यांनी लाक्षणिक उपोषणाची नोटीस देताच प्रशासनाने गार्डन मधील तण काढणे, बागेला पाणी देणे, फवारणी करणे, ऊखडलेला रस्ता दुरूस्त करणे, गार्डनच्या तारांचे कुपण सुरू करणे, आदि कामे करण्याचा सपाटा लावला आहे. हे या लाक्षणिक उपोषणाचे यश आले. असे म्हणता येईल. तसेच येत्या 20 दिवसात गार्डनची संपुर्ण सुव्यवस्था करून गार्डन महानगर पालिकेकडे हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया पुर्ण करू अस अभियंता मयूर कांबळे यांनी कल्याणकर यांना सांगीतले.



