ताजा खबरे:
*विमानतळ रोड गार्डनसाठी खा. रवींद्र चव्हाण यांचा पाच लाखाचा निधी आनंद कल्याणकर यांच्या आंदोलनास पाठिंबा*
*गारमाळच्या लेकीने गाठले महापौरपद, अतिदुर्गम आकांक्षित सुरगाणा तालुक्यातून थेट कल्याण डोंबिवली महापालिकेचे नेतृत्व गारमाळची वकील कन्या हर्षाली थविल चौधरी बनली कल्याण डोंबिवलीची महापौ
*जी. टी. पाटील महाविद्यालयात ‘भारतीय धर्म आणि तत्त्वज्ञान’ नोंदलेखन कार्यशाळा उत्साहात संपन्न*
*बामखेडा महाविद्यालयात मराठी पंधरवडा साजरा*
*तोरणमाळ येथील श्री गोरक्षनाथ मंदिर परिसरात तोतया योगीविरोधात कारवाईची मागणी*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*गारमाळच्या लेकीने गाठले महापौरपद, अतिदुर्गम आकांक्षित सुरगाणा तालुक्यातून थेट कल्याण डोंबिवली महापालिकेचे नेतृत्व गारमाळची वकील कन्या हर्षाली थविल चौधरी बनली कल्याण डोंबिवलीची महापौ

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*गारमाळच्या लेकीने गाठले महापौरपद, अतिदुर्गम आकांक्षित सुरगाणा तालुक्यातून थेट कल्याण डोंबिवली महापालिकेचे नेतृत्व गारमाळची वकील कन्या हर्षाली थविल चौधरी बनली कल्याण डोंबिवलीची महापौ

  • Share:

*गारमाळच्या लेकीने गाठले महापौरपद, अतिदुर्गम आकांक्षित सुरगाणा तालुक्यातून थेट कल्याण डोंबिवली महापालिकेचे नेतृत्व गारमाळची वकील कन्या हर्षाली थविल चौधरी बनली कल्याण डोंबिवलीची महापौर*
सुरगाणा(प्रतिनिधी):-सुरगाणा तालुक्यातील चिराई  घाटमाथ्याच्या पायथ्याशी वसलेल्या, दुर्गम व आदिवासीबहुल गारमाळ या छोट्याशा गावासाठी आज अभिमानाचा क्षण आहे. नावाप्रमाणेच हिरवळीने नटलेले, बनपाडा–मानतोडी धरणाच्या पाण्यावर बागायती शेती करणारे गारमाळ हे तालुक्यातील एकमेव गाव. याच गावातील कन्या अ‍ॅड. हर्षाली राजाराम थविल चौधरी हिची कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौरपदी निवड झाल्याने अतिदुर्गम व आकांक्षित तालुक्यातील लेकीला थेट महानगराच्या नेतृत्वाची संधी मिळाली आहे. या ऐतिहासिक निवडीमुळे संपूर्ण सुरगाणा तालुक्यासह आदिवासी समाजात आनंदाचे वातावरण असून, हर्षाली थविल यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.संघर्षातून घडलेले नेतृत्व
गारमाळ येथील मूळ रहिवासी असलेले हर्षाली यांचे वडील राजाराम थविल हे सुमारे चाळीस ते पन्नास वर्षांपूर्वी रोजगाराच्या शोधात कल्याणजवळील पडघा येथे गेले. त्यांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत वायरमन म्हणून सेवा बजावली. नोकरीच्या निमित्ताने कल्याण शहरात स्थायिक झाल्यानंतरही त्यांनी मूळ गावाशी नाळ घट्ट ठेवली.
आई मंदाबाई थविल यांनी घरकाम सांभाळत दोन्ही मुलांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले. कष्ट, मेहनत, काटकसर आणि संस्कारांची शिदोरी देत त्यांनी मुलांच्या आयुष्याची घडी बसवली. भाऊ राहुल थविल सध्या मुंबई येथे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.
वकिलीपासून समाजकारणापर्यंतचा प्रवास हर्षाली थविल यांनी वकिलीचे शिक्षण पूर्ण करून मुंबई उच्च न्यायालयात खाजगी वकिली प्रॅक्टिस सुरू केली. मात्र केवळ न्यायालयीन कामकाजापुरते न थांबता, समाजकारणाची आवड आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांप्रती असलेली तळमळ त्यांना राजकीय व सामाजिक क्षेत्राकडे घेऊन गेली.
लोकहिताच्या कामासाठी त्यांनी शिवसेना (शिंदे गट)च्या माध्यमातून सक्रिय राजकारणात प्रवेश केला. वडवली व अटाळी प्रभागातून सलग दोन वेळा नगरसेविका म्हणून निवडून येत त्यांनी मूलभूत सुविधा, महिला प्रश्न, स्वच्छता, रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य व सामाजिक उपक्रमांमध्ये ठोस कामगिरी केली. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला.
जनतेच्या विश्वासातून महापौरपद
लोकाभिमुख कामकाज, स्वच्छ प्रतिमा आणि संघटनात्मक बांधिलकी यामुळे जनतेने पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास टाकत, शिवसेना शिंदे गटाच्या वतीने महापौरपदी विराजमान होण्याची संधी दिली. महानगर पालिकेच्या नेतृत्वात प्रथमच गारमाळसारख्या अतिदुर्गम आदिवासी गावातील कन्या पोहोचल्याने हा क्षण ऐतिहासिक मानला जात आहे. कुटुंबाचा सामाजिक पाठिंबा
हर्षाली थविल यांचे पती विजय गोविंद चौधरी हे इंजिनिअर असून कल्याण येथे बांधकाम व्यावसायिक म्हणून कार्यरत आहेत. विजयचे वडील हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. कुटुंबाचा ठाम पाठिंबा आणि सामाजिक जाणीव यामुळे त्यांच्या राजकीय वाटचालीला बळ मिळाले आहे.
आदिवासी समाजासाठी प्रेरणादायी यश,
यापूर्वी सुरगाणा तालुक्यातील सतखांब येथील सूनबाई, साक्री तालुक्याच्या विद्यमान आमदार मंजुळा गावित यांनी धुळे महानगरपालिकेचे महापौरपद भूषविले होते. त्यानंतर आता हर्षाली थविल यांच्या निवडीमुळे आदिवासी समाजातील महिलांच्या कार्यकुशलतेच्या कर्तृत्ववाची नवी प्रेरणा निर्माण झाली आहे.
अतिदुर्गम भागातून शिक्षण, कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर महानगराच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचलेली ही वाटचाल, ग्रामीण व आदिवासी भागातील तरुणींना नवी दिशा देणारी ठरणार आहे या निवडीचे
सुरगाणा शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष भरत वाघमारे तालुका अध्यक्ष हरीभाऊ भोये, एकनाथ भोये, गणेश पवार, अर्जुन शिंदे, राहुल जोशी, पुष्पा वाघमारे, अरुणा वाघमारे, राधा वाघमारे, प्रमिला भोये, सचिन आहेर, भगवान आहेर, युवराज जाधव, अरुण पवार, सनी सोमवंशी, गणेश चाफळकर गारमाळचे ग्रामस्थ
सुरेश थविल, विनायक थविल, चरण थविल, सुभाष थविल, प्रकाश थविल आदींनी अभिनंदन केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*विमानतळ रोड गार्डनसाठी खा. रवींद्र चव्हाण यांचा पाच लाखाचा निधी आनंद कल्याणकर यांच्या आंदोलनास पाठिंबा*
January, 30 2026
*गारमाळच्या लेकीने गाठले महापौरपद, अतिदुर्गम आकांक्षित सुरगाणा तालुक्यातून थेट कल्याण डोंबिवली महापालिकेचे नेतृत्व गारमाळची वकील कन्या हर्षाली थविल चौधरी बनली कल्याण डोंबिवलीची महापौ
January, 30 2026
*जी. टी. पाटील महाविद्यालयात ‘भारतीय धर्म आणि तत्त्वज्ञान’ नोंदलेखन कार्यशाळा उत्साहात संपन्न*
January, 30 2026
*बामखेडा महाविद्यालयात मराठी पंधरवडा साजरा*
January, 30 2026
*तोरणमाळ येथील श्री गोरक्षनाथ मंदिर परिसरात तोतया योगीविरोधात कारवाईची मागणी*
January, 30 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज