*जी. टी. पाटील महाविद्यालयात ‘भारतीय धर्म आणि तत्त्वज्ञान’ नोंदलेखन कार्यशाळा उत्साहात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जी. टी. पाटील महाविद्यालयात ‘भारतीय धर्म आणि तत्त्वज्ञान’ नोंदलेखन कार्यशाळा उत्साहात संपन्न*
*जी. टी. पाटील महाविद्यालयात ‘भारतीय धर्म आणि तत्त्वज्ञान’ नोंदलेखन कार्यशाळा उत्साहात संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्र शासनाच्या मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ व जी. टी. पाटील महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘भारतीय धर्म आणि तत्त्वज्ञान’ विषयावरील नोंदलेखन कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. कार्यशाळेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. एम. जे. रघुवंशी हे होते. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, “भारतीय धर्म आणि तत्त्वज्ञानाची समृद्ध परंपरा जतन व प्रसारित करण्याचे अत्यंत सामर्थ्य मराठी भाषेत आहे. संत साहित्य, भक्ती चळवळ, समाजसुधारकांचे विचार आणि प्राचीन ग्रंथांचा वारसा यांमुळे मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून चिंतन, अध्यात्म आणि मूल्यपरंपरेची वाहक ठरली आहे. या वारशाचे शास्त्रीय पद्धतीने नोंदलेखन होणे ही काळाची गरज आहे.” प्रमुख व्याख्याते ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विश्वास पाटील यांनी मराठीतील प्राचीन इतिहास, संत वाङ्मय आणि विविध साहित्यिक परंपरांची उदाहरणे देत मराठी भाषेची थोरवी अधोरेखित केली. ते म्हणाले, “ज्ञान, विचार आणि अनुभूती यांचे जतन लेखनातूनच होते. भारतीय तत्त्वज्ञानातील गूढ आणि व्यापक संकल्पना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याची ताकद मराठी भाषेत आहे. अभ्यासपूर्ण, संदर्भाधिष्ठित आणि वस्तुनिष्ठ लेखन केल्यास विश्वकोशीय परंपरा अधिक बळकट होईल.” प्रा. डॉ. मनोजकुमार गायकवाड यांनी धर्म व तत्त्वज्ञान विषयक संशोधनाच्या पद्धती, संदर्भ साहित्याचा वापर आणि शास्त्रीय लेखनशैली याविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी स्पष्ट केले की, “तर्क, पुरावे आणि चिकित्सक दृष्टीकोन यांवर आधारित लेखनच दीर्घकाळ टिकणारे ज्ञाननिर्मितीचे कार्य करते.” मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे विद्याव्यासंगी सहाय्यक प्रा. आनंद गेडाम यांनी सादरीकरणातून विश्वकोशीय लेखनाची रचना, निकष आणि लेखकाची जबाबदारी यांचे सविस्तर विवेचन केले. त्यांनी उपस्थितांना आवाहन केले की, “प्रत्येक अभ्यासकाने आपल्या क्षेत्रातील प्रामाणिक व अभ्यासपूर्ण नोंदी विश्वकोशासाठी तयार केल्या तर ज्ञानाचा हा महासागर अधिक समृद्ध होईल.”
कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. माधव कदम यांनी प्रास्ताविकातून कार्यशाळेचे उद्दिष्ट व रूपरेषा स्पष्ट केली. सूत्रसंचालन डॉ. मनोज शेवाळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. रुपाली जगताप यांनी मानले. कार्यक्रमाचे एकूण संयोजन विभाग प्रमुख डॉ. सुलतान पवार यांनी केले.
कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा.महेंद्र गावीत, डॉ. सविता पटेल व प्रा. शशिकला नाईक, प्रा. प्रल्हाद वसावे, प्रा.प्रमेश वसावे, माळी यांनी विशेष परिश्रम घेतले. अभ्यासक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यशाळा ज्ञानसमृद्ध आणि प्रेरणादायी ठरली.



