*बामखेडा महाविद्यालयात मराठी पंधरवडा साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*बामखेडा महाविद्यालयात मराठी पंधरवडा साजरा*
*बामखेडा महाविद्यालयात मराठी पंधरवडा साजरा*
शहादा(प्रतिनिधी):-ग्रामविकास संस्थेचे कला व विज्ञान महाविद्यालयात मराठी विभाग आणि विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ॔मराठी भाषा पंधरवाडा ॓ साजरी करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील होते कार्यक्रम सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख लव विद्यार्थी विकास प्रमुख डॉ. सी. एस. करंके यांनी केले. यावेळी एच. आर. पटेल महिला महाविद्यालय व शिरपूर येथील डॉ. युवराज पवार प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांनी ॓ मराठी भाषेची थोरवी ॓ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच साहित्य संपदेचा परिचय करून दिला. साहित्यतील समाज दर्शन किती महत्त्वाचे होते. या अशा अनेक गोष्टींवर त्यांनी प्रकाश टाकला कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुंदर पाडवी यांनी केली तर आभार प्रगटन डॉ. के. पी. पाटील यांनी केले यावेळी व महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सांगता पसायदानाने करण्यात आली.



