*आई जिवदानी भजन मंडळ संलग्न संत सेवा भजन सामाजिक संस्थेतर्फे आई जीवदानी चषक -2026 चे आयोजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आई जिवदानी भजन मंडळ संलग्न संत सेवा भजन सामाजिक संस्थेतर्फे आई जीवदानी चषक -2026 चे आयोजन*
*आई जिवदानी भजन मंडळ संलग्न संत सेवा भजन सामाजिक संस्थेतर्फे आई जीवदानी चषक -2026 चे आयोजन*
विरार(प्रतिनिधी):-आई जीवदानी भजन मंडळ [विरार ते चर्चगेट, सकाळी 7.32] श्री संत सेवा भजन सामाजिक संस्था (पश्चिम रेल्वे प्रवासी भजन महासंघ) यांच्या संयुक्त विद्यमाने आई जीवदानी चषक 2026 अंडरआर्म टर्फ क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सदर स्पर्धा रविवार 1 फेब्रुवारी 2026
सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पाटील टर्फ, नाना नानी पार्क, गणेश टाॅवर समोर विरार पूर्व येथे होणार आहे. आई जिवदानी भजन मंडळ, लोकल प्रवासात भजन माध्यमातून श्री संत सेवा भजन सामाजिक संस्था (पश्चिम रेल्वे प्रवासी भजन महासंघ) आयोजित या उपक्रमातून शैक्षणिक, कला, आरोग्य (रक्तदान शिबीर) वृक्षारोपण, गुढीपाडवा स्वागत दिंडी अशा अनेक सामाजिक, धार्मिक कार्यक्रमात सहभागी होत आले आहे. त्यातूनच रेल्वे प्रवासी भजन स्पर्धा आणि नामस्मरणासोबत आई जीवदानी भजन मंडळाच्या वतीने रविवार 1 फेब्रुवारी रोजी क्रिडा क्षेत्रात रेल्वे प्रवासी भजन मंडळाअंतर्गत आई जीवदानी चषक 2026 अंडरआर्म टर्फ क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे. तरी श्री संत सेवा भजन सामाजिक संस्था (पश्चिम रेल्वे प्रवासी भजन महासंघ) कार्यकरणी पदाधिकारी सदस्य व संलग्न भजन सभासद मंडळानी सदर स्पर्धेला उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन आयोजक आई जिवदानी भजन मंडळ यांनी केले आहे अधिक माहितीसाठी
कृष्णा सुर्वे - ९९६७०९०८५१
शाहिर नितिन रसाळ - ८६५२०६२०७५
गौरव नवाळे- ९३७०९३९५०७ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.



