*मौजे चुनाकोळवण अंबिकेश्र्वर प्रतिष्ठानतर्फे कार्यकर्ता प्रबोधन व व्यक्तिमत्त्व विकास शिबिर "संकल्प 26" उत्साहात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*मौजे चुनाकोळवण अंबिकेश्र्वर प्रतिष्ठानतर्फे कार्यकर्ता प्रबोधन व व्यक्तिमत्त्व विकास शिबिर "संकल्प 26" उत्साहात संपन्न*
*मौजे चुनाकोळवण अंबिकेश्र्वर प्रतिष्ठानतर्फे कार्यकर्ता प्रबोधन व व्यक्तिमत्त्व विकास शिबिर "संकल्प 26" उत्साहात संपन्न*
राजापूर(प्रतिनिधी):-आपला व्यक्तिमत्व विकास आणि त्याचबरोबर गावचा शाश्वत विकास अशी संकल्पना समोर ठेऊन आपण गेली काही वर्षे "संकल्प " या नावाने मार्गदर्शन शिबिराचा कार्यक्रम राबवत आहोत. या वर्षी 11 जानेवारी 2026 रोजी आपला "संकल्प 26" हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नेहमीच्या खेळीमेळीच्या वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. या शिबिराची सुरुवात सौ. उल्का विश्वास यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून झाली. त्यांनी शिबिराला मार्गदर्शनही केले. व्यक्तिमत्व विकास या विषयावर व्याख्याते सुधीर मोहिते यांनी त्यांच्या मार्मिक शब्दांत सर्वांना अनमोल मार्गदर्शन केले. मोहिते यांनी ज्या काही अँक्टिव्हिटी सर्वांकडून करून घेतल्या त्यातून सर्वजण आपल्या बालपणात गेल्याचा भास झाला. दुपारच्या सत्रात व्याख्याते प्रशांत शेलार यांनी सांघिक खेळाच्या माध्यमातून संघटनेचे महत्व व संघटन असेल तर कोणत्याही गोष्टीवर मात करता येते हे पटवून दिले. उदय सरानी माझा गाव माझा परिवार यावर भाष्य केले यातून आपण आपलं गाव एक कुटुंब झाले पाहिजे तसेच आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो ही भावना प्रत्येकाने जपली पाहिजे असे आवाहन केले.
संध्याकाळच्या सत्रात आलेले व्याख्याते विकास देशमुख यांनी शासनाच्या वैद्यकीय योजनांची सखोल माहिती देत सर्वांची मने जिंकली. शासनाकडून वैद्यकीय खूप साऱ्या योजना आहेत त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा व त्यांनी स्वतःहुन सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
एकंदरीत दिवसभराचे वक्तिमत्व विकास व प्रबोधन शिबिर संकल्प 26 या तिसऱ्या पर्वात पुरुषांच्या बरोबरीने महिलांचीही उपस्थिती होती. विशेषतः गावावरून काहीजण या शिबिरासाठी उपस्थित राहिले होते. दैनंदिन जीवनामध्ये आवश्यक असलेले ज्ञान देण्याचा प्रयत्न दिवसभराच्या शिबिरात करण्यात आला. या शिबिरात सर्वांनी झालेल्या सर्व सत्रात उत्साहाने सहभाग घेतला. शिबिराला उपस्थित राहिल्याबद्दल
अध्यक्ष वसंत मटकर सचिव प्रेमानंद मटकर यांनी मौजे चुनाकोळवण अंबिकेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने सर्वांचे आभार मानले व शिबिराची यशस्वी सांगता झाली.



