*हमदर्द फाउंडेशन आणि हाश्मी कमिटीतर्फे 9 जोडप्याचा सामूहिक विवाह सोहळा संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*हमदर्द फाउंडेशन आणि हाश्मी कमिटीतर्फे 9 जोडप्याचा सामूहिक विवाह सोहळा संपन्न*
*हमदर्द फाउंडेशन आणि हाश्मी कमिटीतर्फे 9 जोडप्याचा सामूहिक विवाह सोहळा संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-हमदर्द फाउंडेशन आणि हाश्मी कमिटीच्या वतीने सालाबादाप्रमाणे यावर्षी ही 29 जानेवारी 2026 गुरुवार रोजी पारंपरिक आणि धार्मिक वातावरणात सामूहिक विवाह सोहळा नंदुरबार शहरातील रज्जाक पार्क येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला, या कार्यक्रमाचे आयोजन हाजी सैय्यद मोहम्मद शफी बापू मेमोरीयल ट्रस्ट गुजरात, हमदर्द फाउंडेशन नंदुरबार, आणि हाश्मी कमेटी नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या सोहळ्यात 9 जोडप्याचा विवाह मुस्लिम पारंपरिक विधी नुसार सामूहिक लावण्यात आला. या विवाह समारंभात पारंपरिक, साधेपणा, सामाजिक ऐक्य, सलोखा आणि कमी खर्चात विवाह, व बचत करण्याचा संदेश देण्यात आला. या आदर्शवत सामूहिक विवाह सोहळ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. या सामूहिक विवाह सोहळ्यामुळे गरजवंत असलेल्या वधू वरांच्या आई वडिलांसह नातेवाईकांनी आयोजकांच्या कार्याचे कौतुक करून त्यांचे व फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. यावेळी विवाह बद्ध झालेल्या मुस्लिम समाजातील वधुवरांना आयोजकांच्या वतीने संसार उपयोगी साहित्य भेट स्वरूपात देण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नंदुरबार शहरातील मुस्लिम समाजातील धर्म गुरु, सामाजिक क्षेत्रातील समाजसेवक व सर्व जबाबदार घटकांनी विशेष प्रयत्न केले, या सोहळ्यामुळे अनावश्यक खर्चाला आला बसला आणि समाजाला साधेपणाचा संदेश मिळाला.



