*डी आर हायस्कूल येथे दंतआरोग्य शिबीर संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*डी आर हायस्कूल येथे दंतआरोग्य शिबीर संपन्न*
*डी आर हायस्कूल येथे दंतआरोग्य शिबीर संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूल येथे नंदुरबार जिल्हा रुग्णालय व इंडियन डेल्टाला असोसिएशन (IDA) यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय दंत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर इंडियन डेंटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ घनश्याम पाटील जिल्हा दंतशल्य चिकित्सक डॉ कल्पेश चव्हाण, डॉ आफरीन शेख शाळेचे मुख्याध्यापक मोहन अहिरराव, उपमुख्याध्यापक श्रीराम मोडक, पर्यवेक्षक संजय सैंदाणे, हेमंत खैरनार हे उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शाळेचे उपमुख्याध्यापक श्रीराम मोडक यांनी आपल्या दातांची काळजी कशी घ्यावी, हे समजवून सांगितले. जिल्हा दंतशल्य चिकित्सक डॉक्टर कल्पेश चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना पासपोर्ट व जंक फूड यापासून होणाऱ्या विकारांपासून आपल्या दातांचे आरोग्य कसे वाचवावे हे समजवून सांगितले.
डॉक्टर आश्रम शेख यांनी विद्यार्थ्यांना दात स्वच्छ कसे घासावे याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
यावेळी इंडियन डेंटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर घनश्याम पाटील यांच्यातर्फे दात स्वच्छ करण्याची एक किट विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश बच्छाव यांनी केले तर आभार शशिकांत हजारी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकांच्या कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.



