*ग्रामविकास संस्था संचलित कला व विज्ञान महाविद्यालय, बामखेडे येथे विद्यार्थ्यांसाठी 15 दिवसीय सॉफ्ट स्किल प्रशिक्षण कार्यशाळा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*ग्रामविकास संस्था संचलित कला व विज्ञान महाविद्यालय, बामखेडे येथे विद्यार्थ्यांसाठी 15 दिवसीय सॉफ्ट स्किल प्रशिक्षण कार्यशाळा*
*ग्रामविकास संस्था संचलित कला व विज्ञान महाविद्यालय, बामखेडे येथे विद्यार्थ्यांसाठी 15 दिवसीय सॉफ्ट स्किल प्रशिक्षण कार्यशाळा*
शहादा(प्रतिनिधी):-ग्रामविकास संस्था संचलित कला व विज्ञान महाविद्यालय, बामखेडे टी.टी., ता. शहादा, जि. नंदुरबार येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी Resonance Pvt. Ltd., पुणे यांच्या सहकार्याने 15 दिवसीय सॉफ्ट स्किल प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन संस्थेचे सचिव बी. व्ही. चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष दादासाहेब पी. बी. पटेल हे होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील, Resonance Pvt. Ltd., पुणे चे व्यवस्थापकीय संचालक विवेक सिनारे व श्रीमती बधवान हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या प्रशिक्षण कार्यशाळेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये संवाद कौशल्य, नेतृत्वगुण, आत्मविश्वास, वेळ व्यवस्थापन, संघभावना, मुलाखत कौशल्ये तसेच व्यावसायिक शिस्त यांचा विकास करणे हा आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ शैक्षणिक ज्ञान पुरेसे नसून सॉफ्ट स्किल्सना विशेष महत्त्व असल्याने हे प्रशिक्षण विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
Resonance Pvt. Ltd., पुणे येथील अनुभवी प्रशिक्षकांकडून प्रत्यक्ष उदाहरणे, कृतीआधारित उपक्रम, समूह चर्चा व सादरीकरणाच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाणार आहे. या कार्यशाळेत विविध महाविद्यालयातील 85 विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एस. एस. दुथडे यांनी केले. प्रास्ताविक डॉ. वाय. आर. पाटील यांनी मांडले, तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. सी. एस. करंके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी वर्गाने विशेष परिश्रम घेतले.



