*21वे नगराध्यक्ष करंडक देश भक्तीपर नृत्य स्पर्धा संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*21वे नगराध्यक्ष करंडक देश भक्तीपर नृत्य स्पर्धा संपन्न*
*21वे नगराध्यक्ष करंडक देश भक्तीपर नृत्य स्पर्धा संपन्न*
नंदूरबार(प्रतिनिधी):-कल्चरल फाउंडेशन नंदुरबार तर्फे डी आर हायस्कूल येथे नगराध्यक्ष करंडक सोलो व समूह नृत्य स्पर्धा घेऊन प्रजासत्ताक दिवस साजरा करण्यात आला. एकूण 28 संघानी भाग घेतला. सुरुवातीला कार्यक्रमाचे उदघाटन नगर सेवक अमित रघुवंशी, देवेंद्र जैन, ऍडव्होकेट राऊ मोरे, प्रेम सोनार यांच्या हस्ते संपन्न झाले. या वेळेस दोन कलाकारांना त्यांच्या कार्याचे कौतुक म्हणून पारितोषिके देण्यात आले. डॉ दिनेश बबन देवरे यांना उत्कृष्ट सूत्र संचालन अवॉर्ड देण्यात आले आणि काशिनाथ रोहिदास सुर्यवंशी (प्रयोगशाळा सहाय्यक के.डी. गावीत सैनिकी विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, पथराई) यांना अभिनय क्षेत्राचे पथनाट्य, मुकनाट्य,नाटक यामध्ये कला गौरव पुरस्कार 2026 मान्यवरच्या हस्ते प्रधान करण्यात आले. या वर्षी 21 वे नगराध्यक्षा करंडक उत्सव साजरा झाला. स्पर्धेचे विजेते सोलो लहान गट पवित्रा कावळे प्रथम, सिया जैन द्वितीय, वेदांत मराठे तृतीय, दिक्षा चौधरी चतुर्थ, भार्गवी बागुल पंचम,
सोलो मोठा गट
नितेश अग्रवाल प्रथम, गौरव सोनार द्वितीय, प्रेरणा जगताप तृतीय, साहिल गवळे चतुर्थ, अर्चना ईशी पंचम, समूह नृत्य लहान गट अनुसूचित जाती वस्ती गृह होळतर्फे हवेली प्रथम,
अहिंसा स्कूल द्वितीय, एम के डी एम स्कूल तृतीय
समूह नृत्य मोठा गट
अनुसूचित जाती मुलींचे वस्ती गृह होळ तर्फे हवेली प्रथम, श्रॉफ् हायस्कूल द्वितीय,
डी आर हायस्कूल तृतीय, एम के डी एम स्कूल चतुर्थ
बक्षीस वितरण संस्थेचे अध्यक्ष राजेश रघुवंशी, उपाध्यक्ष डॉ. विजय पटेल, सचिव सुभाष मोरावकर, डॉ सपना अग्रवाल, श्रीराम मोडक, दुर्गेश वैष्णव यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. परीक्षक म्हणून दोंडाईचा येथील विक्की बाटुंगे यांनी भूमिका स्वीकारली.
कार्यक्रमा चे सूत्र संचालन धर्मेंद्र भारती व डॉ दिनेश देवरे यांनी केले
या स्पर्धेचे प्रोजेक्ट चेअरमन जितेंद्र खवळे व उपप्रोजेक्ट चेअरमन चंपालाल चौधरी यांनी स्पर्धेची पूर्ण जबाबदारी स्वीकारली. त्यांना मदत करणारे बाळासाहेब मोरे, महेश बोरसे, प्रिय दर्शन पवार, डॉ नरेंद्र गोसावी हे होते. राहुल मेघे व प्रविण पाटील यांनी देशभक्ती पर गीत सादर केले शेवटी आभार प्रदर्शन प्रोजेक्ट चेअरमन जितेंद्र खवळे यांनी मानले.



