*लाखापूर माध्यमिक विद्यालयात अरुणोदय सिकल सेल मोहिमेंतर्गत विद्यार्थ्यांची सिकल सेल तपासणी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*लाखापूर माध्यमिक विद्यालयात अरुणोदय सिकल सेल मोहिमेंतर्गत विद्यार्थ्यांची सिकल सेल तपासणी*
*लाखापूर माध्यमिक विद्यालयात अरुणोदय सिकल सेल मोहिमेंतर्गत विद्यार्थ्यांची सिकल सेल तपासणी*
तळोदा(प्रतिनिधी):-तालुक्यातील लाखापूर फॉरेस्ट येथील लाखापूर माध्यमिक विद्यालयात अरुणोदय सिकल सेल मोहिमे अंतर्गत सिकल सेल तपासणी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या उपक्रमात इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
विद्यालयातील इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची सिकल सेल तपासणी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी कोणताही संकोच न ठेवता तपासणी करून घेतली, यामुळे या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळाला. आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सिकल सेल आजाराबाबत जनजागृती करणे तसेच लवकर निदान करून पुढील उपचार व मार्गदर्शन देणे हा आहे. या तपासणीसाठी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. पल्लवी जाधव, आरोग्य सेविका सुनिता पाडवी, आशा सेविका ललिता नाईक, संगीता राहसे व आरोग्य मदतनीस ताईबाई ढोडरे यांचे पथक उपस्थित होते. पथकाने विद्यार्थ्यांची तपासणी करतानाच सिकल सेल आजाराची माहिती दिली. सिकल सेल वाहक, सिकल सेल रुग्ण, त्यांची लक्षणे, प्रतिबंधक उपाय, योग्य वेळी तपासणीचे महत्त्व व पुढील उपचार पद्धती याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या वेळी विद्यार्थ्यांमध्ये सिकल सेल आजाराविषयी जागरूकता निर्माण झाली असून, भविष्यात आरोग्याच्या दृष्टीने योग्य निर्णय घेण्यास ही माहिती निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. लाखापूर माध्यमिक विद्यालयात राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे शिक्षक, विद्यार्थी व पालकांकडून स्वागत करण्यात आले असून आरोग्य विभागाच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.



