*जागतिक कृषी महोत्सव 2026 मध्ये नंदुरबारच्या भुजगाव ग्रामपंचायतीला कृषी माऊली सन्मान आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जागतिक कृषी महोत्सव 2026 मध्ये नंदुरबारच्या भुजगाव ग्रामपंचायतीला कृषी माऊली सन्मान आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित*
*जागतिक कृषी महोत्सव 2026 मध्ये नंदुरबारच्या भुजगाव ग्रामपंचायतीला कृषी माऊली सन्मान आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित*
नाशिक(प्रतिनिधी):-नाशिक येथे 23 जानेवारी ते 27 जानेवारी 2026 दरम्यान सुरू असलेल्या जागतिक कृषी महोत्सव 2026 मध्ये महाराष्ट्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सरपंचांचा आदर्श सरपंच म्हणून सन्मान करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम धडगाव तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत भुजगाव यांना सन 2026 चा प्रतिष्ठेचा “कृषी माऊली सन्मान आदर्श सरपंच पुरस्कार” जाहीर झाला आहे.
ग्रुप ग्रामपंचायत भुजगाव अंतर्गत जलसंवर्धन, माती संवर्धन, पर्यावरण संरक्षण, रोजगाराभिमुख उपक्रम, बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, जैवविविधता संवर्धन, प्रभावी ग्राम प्रशासन तसेच मूलभूत व पायाभूत सुविधांवरील उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ग्रुप ग्रामपंचायत भुजगावच्या वतीने हा पुरस्कार लोकनियुक्त सरपंच अर्जुन पावरा, उपसरपंच कविता पावरा ग्रामपंचायत सदस्य कैलास पावरा, दिलीप पावरा, रविंद्र पावरा, शंकर पावरा, ग्राम रोजगार सेवक सुभाष पावरा, तसेच दिनेश पाडवी व संदीप पावरा यांनी स्वीकारला.
हा सन्मान अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर व प्रधान केंद्र दिंडोरी प्रणित मार्गातून जागतिक कृषी महोत्सव अंतर्गत पिठाचे पिठाधीश प.पु. गुरुमाऊली व गुरुपुत्र आबासाहेबांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी लोकनियुक्त सरपंच अर्जुन पावरा यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या विविध विकासात्मक उपक्रमांची सविस्तर माहिती व्यासपीठावर मांडली. ग्रामपंचायतीच्या कार्याची दखल घेतच हा पुरस्कार प्रदान करण्यात आल्याचे आयोजकांनी नमूद केले. ग्रामसेवकांची प्रतिक्रिया यांनी मोहनलाल वळवी यावेळी ग्रामसेवकांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “भुजगाव ग्रामपंचायतीने संघभावनेने व नियोजनबद्ध पद्धतीने केलेल्या कामांचे हे फलित आहे. लोकनियुक्त सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी आणि ग्रामस्थ यांच्या एकत्रित प्रयत्नातूनच हे यश मिळाले आहे. भविष्यातही शाश्वत विकास, पर्यावरण संरक्षण आणि लोकाभिमुख योजना प्रभावीपणे राबविण्याचा आमचा निर्धार आहे.



