*डी आर हायस्कूलमध्ये एनडीआरएफ तर्फे प्रात्यक्षिके सादर*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*डी आर हायस्कूलमध्ये एनडीआरएफ तर्फे प्रात्यक्षिके सादर*
*डी आर हायस्कूलमध्ये एनडीआरएफ तर्फे प्रात्यक्षिके सादर*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूल येथे NDRF (National Disaster Response Force) व SDRF (State Disaster Response Force) यांच्या मार्फत आपत्ती व्यवस्थापना संदर्भातील विविध प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांसमोर सादर करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक मोहन अहिरराव, उपमुख्याध्यापक श्रीराम मोडक, पर्यवेक्षक संजय सैंदाणे, हेमंत खैरनार, NDRF टीम प्रमुख इन्स्पेक्टर राहुल कुमार रघुवंश, SDRF टीम प्रमुख विजय गवांडे, ASI NDRF टीम उपप्रमुखविजय म्हस्के, शाळेचे NCC कमांडर राहुल पाटील हे उपस्थित होते. यावेळी राहुल कुमार रघुवंश यांनी NDRF स्थापने मागचा इतिहास NDRF चे उद्देश व त्याची कार्य, आपत्ती जनक परिस्थितीत मदत करणारी प्रमुख यंत्रणा आहे, विद्यार्थ्यांना समजून सांगितली. विजय म्हस्के यांनी विद्यार्थ्यांना कधी नैसर्गिक आपत्ती आली असता स्वतःच्या बचाव कसा करावा हे प्रात्यक्षिक करून सादर केले. तसेच जर कोणाला इजा झाली, आकस्मित काही अपघात झाला तर त्याच्यावर उपचार कसे करावे हे सर्व प्रात्यक्षिकातून विद्यार्थ्यांना समजून सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेच्या कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.



