*नंदुरबारमध्ये 31 जानेवारी रोजी राज्यस्तरीय विज्ञान परिषद (C.A.B.F.F.–2026) चे आयोजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबारमध्ये 31 जानेवारी रोजी राज्यस्तरीय विज्ञान परिषद (C.A.B.F.F.–2026) चे आयोजन*
*नंदुरबारमध्ये 31 जानेवारी रोजी राज्यस्तरीय विज्ञान परिषद (C.A.B.F.F.–2026) चे आयोजन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-31 जानेवारी 2026 रोजी अंतर्गत गुणवत्ता विभाग, प्राणिशास्त्र विभाग व वनस्पतीशास्त्र विभाग, नंदुरबार तालुका विधायक समिती संचालित जी. टी. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नंदुरबार तसेच पी. एम. उषा योजना, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय राज्यस्तरीय परिषद (C.A.B.F.F.–2026) आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेसाठी राज्यातील विविध विद्यापीठांतून नामवंत व मान्यवर वक्ते उपस्थित राहणार असून, प्राणी व वनस्पती विज्ञान विषयांतील अद्ययावत संशोधनावर आधारित व्याख्याने दिवसभर चालणार आहेत. संशोधन, नवकल्पना व शैक्षणिक प्रगती यांना चालना देणारा हा मंच विद्यार्थ्यांपासून ते संशोधक व प्राध्यापकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या परिषदेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थी, संशोधक व प्राध्यापकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. एम. जे. रघुवंशी, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख व परिषदेचे निमंत्रक डॉ. प्रेमकुमार गौतम तसेच प्राणिशास्त्र विभागप्रमुख व परिषदेचे सचिव डॉ. गोविंद बळदे यांनी केले आहे. ही परिषद नंदुरबार जिल्ह्यातील विज्ञान शिक्षण व संशोधनासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.



