*वीरशिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांची 429 वी पुण्यतिथी, चावंड येथे मध्यरात्री श्रद्धांजली, समाधीस्थळ जिर्णोद्धारास गती*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*वीरशिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांची 429 वी पुण्यतिथी, चावंड येथे मध्यरात्री श्रद्धांजली, समाधीस्थळ जिर्णोद्धारास गती*
*वीरशिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांची 429 वी पुण्यतिथी,चावंड येथे मध्यरात्री श्रद्धांजली, समाधीस्थळ जिर्णोद्धारास गती*
चावंड(प्रतिनिधी):-स्वराज्य, स्वाभिमान व राष्ट्रनिष्ठेचे प्रतीक असलेल्या वीरशिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या 429 व्या तिथीनुसार पुण्यतिथीनिमित्त आज मध्यरात्री ठीक 12 वाजता चावंड (राजस्थान) येथील त्यांच्या समाधीस्थळी भावपूर्ण वातावरणात दर्शन व पुष्पांजली अर्पण करण्यात आली. तर सकाळी 11 वाजता शेकडोंच्या संख्येने महाराणा प्रताप यांना सार्वजनिक श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी “महाराणा प्रताप स्मारक अभियान” च्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रविरसिंह नमाना यांच्या नेतृत्वाखाली महाराणा प्रतापसिंह यांच्या समाधीस्थळाच्या जिर्णोद्धाराचे कार्य हाती घेण्यात आले असून, या पवित्र व ऐतिहासिक कार्यासाठी देशभरातील विविध स्तरांतून सहकार्य व मदत मिळत आहे.
पुण्यतिथीनिमित्त आयोजित श्रद्धांजली व पुष्पांजली कार्यक्रमास महाराणा प्रताप स्मारक अभियान समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रवीरसिंह नमाणा, अभिराजसिंग राठोड, रविंद्रसिंह राजावत, मंथन पंचोली, अजयसिंग शक्तावत, रणधीरसिंह ठाकुर, मंगलसिंग पंडितसिंग राजपूत (भोरखेडा),=अमृतसिंग सिसोदिया (वेलदा), प्रदिपसिंह राजपूत (भावेर), सचिन राजपूत (सावळदे), जयपालसिंह गिरासे (पिंपरी), शक्तिसिंह राजपूत (विरवाडा), जसपालसिंह राजपूत (टेंबे), विरपालसिंह राजपूत (शिरपूर),0योगेश राजपूत (भटाणे), संदीप राजपूत (नाणे) आदी मान्यवर, पदाधिकारी व वीरप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या अद्वितीय पराक्रम, त्याग व स्वराज्यनिष्ठेला अभिवादन करत त्यांच्या स्मृतीस विनम्र श्रद्धांजली अर्पण केली. चावंड ही महाराणा प्रतापसिंह यांच्या जीवनातील अखेरची राजधानी असून, येथील समाधीस्थळ हे राष्ट्रभक्ती व इतिहासाचे जिवंत स्मारक मानले जाते.
समाधीस्थळाच्या जिर्णोद्धारामुळे हा ऐतिहासिक वारसा पुढील पिढ्यांसाठी अधिक सुदृढ व प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.



