*राष्ट्रपती भवनातील अवर्णनीय आणि नेत्रदीपक ॲट होम रिसेप्शन सोहळा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*राष्ट्रपती भवनातील अवर्णनीय आणि नेत्रदीपक ॲट होम रिसेप्शन सोहळा*
*राष्ट्रपती भवनातील अवर्णनीय आणि नेत्रदीपक ॲट होम रिसेप्शन सोहळा*
नांदेड(प्रतिनिधी):-26 जानेवारी 2026 रोजी भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती भवनात रिसेप्शन ॲट होम या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. देशातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांना (Builders of Nation) भारताच्या महामहीम राष्ट्रपती आणि राष्ट्रपती भवनामार्फत विशेष निमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्र सरकारचे अनेक मंत्री, भारताचे चीफ जस्टिस, परदेशी पाहुणे आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर यांची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमास नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथील डॉक्टर दिलीप पुंडे यांच्या सर्पदंश कार्याची दखल घेऊन त्यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण प्राप्त झाले आणि त्यांना हा अत्यंत आनंदाचा आणि भाग्याचा क्षण लाभला, महामहिम राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्याशी भेट आणि वैयक्तिक संवाद साधण्याची संधी डॉ. पुंडे यांना मिळाली. यासोबतच भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर, आरोग्य मंत्री जेपी नड्डाजी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, पियुषजी गोयल, अजित डोभाल आदि मान्यवरांसोबत सर्पदंश या विषयावर चर्चा केली. शेतकरी आणि शेतमजुरांच्या व्यथा या महोदयांसमोर मांडण्याचा योग आला. नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथील गल्लीपासून सुरू झालेला डॉक्टर दिलीप पुंडे यांच्या आरोग्यसेवेचा प्रवास राष्ट्रपती भवनापर्यंत आणि जागतिक आरोग्य संघटने पर्यंत पोहोचला. गोरगरीब शेतकरी, शेतमजूर आणि सर्पदंश रुग्णांच्या वेदनेची संवेदना निश्चितच राष्ट्रपती भवना पर्यंत पोहोचली.
मागील 38 वर्षांपासूनच़्या त्यांच्या अखंड, अविरत आणि अथक आरोग्य सेवेचे हे फलित. हा कार्यक्रम पाहून मन भरून आले. डॉक्टर दिलीप पुंडे यांनी महामहीम राष्ट्रपती आणि केंद्र सरकारचा विशेष ऋणी असल्याचे सांगितले. भगवंताचे आशीर्वाद
माझे दिवंगत आईवडील, माझी पत्नी, माझी शासकीय विद्यानिकेतन संभाजीनगर ही शाळा, सर्व गुरुजन, माझी पत्नी, मुलगा, कन्या पुंडे हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी आणि सेवेची संधी देणारे हजारो रुग्ण यांच्यामुळे या सोहळ्याचा भागीदार होता आले. हा सोहळा म्हणजे निश्चितच आठवणींचा ठेवा होय. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत असे डॉ दिलीप पुंडे यांनी सांगितले.



