*ओझर ट्रॉफीवर ओमसाई तांबळवाडीने कोरले नाव तर द्वितीय क्रमांक साईराज तेली वाडीने पटकावला*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*ओझर ट्रॉफीवर ओमसाई तांबळवाडीने कोरले नाव तर द्वितीय क्रमांक साईराज तेली वाडीने पटकावला*
*ओझर ट्रॉफीवर ओमसाई तांबळवाडीने कोरले नाव तर द्वितीय क्रमांक साईराज तेली वाडीने पटकावला*
राजापूर(प्रतिनिधी):-माघी गणेश जयंती उत्सवानिमित्त दुर्गादेवी गोसावी वाडी यांच्या वतीने दरवर्षी विघ्नेश्वर चषक – ओझर ट्रॉफी (वार्षिक क्रिकेट स्पर्धा) या भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. ही स्पर्धा केवळ खेळापुरती मर्यादित नसून गावातील क्रीडाप्रेम, एकोपा आणि परंपरेचे प्रतीक बनली आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेत साईराज तेलीवाडी ओझर क्रिकेट क्लबने सातत्यपूर्ण आणि दमदार कामगिरी करत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आतापर्यंत झालेल्या स्पर्धांमध्ये हा संघ सातत्याने फायनलमध्ये प्रवेश करत असून 4 वेळा विघ्नेश्वर चषक आपल्या नावे करण्याचा मान मिळवला आहे. कोरोना कालावधी वगळता या स्पर्धेत साईराज तेलीवाडी ओझर क्रिकेट क्लबची कामगिरी नेहमीच उल्लेखनीय राहिली आहे. आजवर साईराज तेलीवाडी ओझर क्रिकेट क्लबने सन 2020 मध्ये
प्रथम चषक, 2024
द्वितीय चषक, सन 2025
प्रथम चषक आणि 2026 मध्ये आता माघी गणेशोत्सवानिमित्त झालेल्या स्पर्धेत
द्वितीय चषक क्रमांक पटकावला आहे. प्रत्येक वर्षी ही क्रिकेट स्पर्धा दोन टप्प्यांत पार पडते. पहिला टप्पा वाडी मर्यादित तर दुसरा टप्पा गाव मर्यादित असतो
साईराज तेलीवाडी ओझर क्रिकेट क्लब हा संघ नेहमीच दुसऱ्या म्हणजेच गाव मर्यादित टप्प्यात खेळतो. या टप्प्यात दरवर्षी गावातील तसेच परिसरातील अनेक नावलौकिक क्रिकेट संघ सहभागी होतात. अशा बलाढ्य संघांना पराभूत करून फायनलमध्ये प्रवेश करणे ही साईराज तेलीवाडी ओझर संघाची खासियत ठरली आहे.
याच सातत्यपूर्ण यशामुळे, संघभावना, शिस्तबद्ध खेळ आणि जिद्दीच्या जोरावर साईराज तेलीवाडी ओझर क्रिकेट क्लब आजच्या घडीला नंबर 1 टीम म्हणून ओळखला जात आहे. या संघाच्या या यशाबद्दल संपूर्ण गावाला आणि क्रीडाप्रेमींना निश्चितच अभिमान वाटतो. यंदाच्या स्पर्धेत ओम साई तांबळवाडी विजेता ठरला तर उपविजेते पदाचा मान साईराज तेलीवाडी, ओझर संघाला मिळाला आहे तर तृतीय क्रमांक विघ्नहर्ता साबळेवाडी पटकावला आहे सर्व विजेत्या संघाचे व खेळाडूंचे ओझर पंचक्रोशीतून अभिनंदन होत आहे.



