*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा*
*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा*
तळोदा(प्रतिनिधी):-माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे मुख्याध्यापक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष तुळाजा गावाचे लोकनियुक्त सरपंच सौ मीरा रहासे होत्या. तर ध्वजारोहण तुळाजा
गावाचे उपसरपंच संदीप खर्डे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांचे सामूहिक कवायत मैदानावर घेण्यात आली. त्यानंतर विविध कला, कौशल्यात
यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना
मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक
दिना निमित्त भाषणे केली. या कार्यक्रमाला रतीलाल डूमकुळ, सीताराम राहासे, विक्रम डूमकुळ
दिलीप पवार, तेजाब ठाकरे,तसेच
ग्राम पंचायत कर्मचारी, आरोग्य कर्मचारी अंगणवाडी सेविका, आशा
सेविका तसेच मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
राजेंद्र ढोडरे यांनी केले तर आभार विलास मगरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संदीप मोरे, विलास पाडवी, तुकाराम भील, पंकज खेडकर, राहुल साळुंखे, सुदाम जांभोरे, संतोष राठोड तसेच मोहन वळवी, सुबोध जावरे यांनी परिश्रम घेतले.



