*बस चालकाची भूमिका कुटुंब प्रमुखांसारखी असावी-प्रा दत्ता वाघ*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*बस चालकाची भूमिका कुटुंब प्रमुखांसारखी असावी-प्रा दत्ता वाघ*
*बस चालकाची भूमिका कुटुंब प्रमुखांसारखी असावी-प्रा दत्ता वाघ*
शहादा(प्रतिनिधी):-"बस चालक जेंव्हा स्टीरिंगवर बसतो तेंव्हा तो बसमधील प्रवासीरूपी परिवाराचा प्रमुख कारभारी बनतो आणि त्यांच्या सुरक्षित प्रवासाची जबाबदारी त्याच्यावर येते तेंव्हा प्रवाशांप्रति त्याला अधिक सजग असावे लागते. आपले कर्तव्य निर्विघ्नपणे याला प्रत्येक चालकाने प्राधान्य द्यायला हवे " असे प्रतिपादन शहादा तालुका प्रवासी संघटनेचे अध्यक्ष, माजी नगरसेवक प्रा दत्ता वाघ यांनी चालक दिनानिमित्त शहादा आगारात चालकांचे समुपदेशन करताना केले. शहादा आगारात शनिवारी चालक दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा दत्ता वाघ, अध्यक्षस्थानी आगरप्रमुख हरीश भोई, स्थानक प्रमुख पी जी पाटील, मिर्जा उपस्थित होते. याप्रसंगी यशस्वी बसचालकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रा दत्ता वाघ समुपदेशन करताना पुढे म्हणाले "चालकांनी सर्व मानसिक ताण तणाव विसरून एकाग्रपणे वाहन चालवण्यास प्राधान्य द्यायला हवे. प्रवासी हेच आपले कुटुंब, दैवत, परिवार आहे हे लक्षात घेऊन कुटुंब प्रमुखांसारखी त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यायला हवी. वाहन चालवताना कोणतेही व्यसन न करता प्रवाशांना सुखरूपपणे निश्चितस्थळी पोहोचवायला हवे कारण आजही जनतेचा एस टी बसवर विश्वास आहे आणि म्हणूनच बहुजन हिताय बहुजन सुखाय असे एस टी बस ला म्हटले जाते." प्रारंभी हरीश भोई यांनी आपले मनोगत व्यक्त केले सूत्र संचालन, आभार प्रदर्शन सुरेश पाटील यांनी केले.



