*दिल्लीतील राष्ट्रीय तेंग सु डो कोरियन कराटे स्पर्धेत नंदुरबारच्या खेळाडूंची घवघवीत कामगिरी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*दिल्लीतील राष्ट्रीय तेंग सु डो कोरियन कराटे स्पर्धेत नंदुरबारच्या खेळाडूंची घवघवीत कामगिरी*
*दिल्लीतील राष्ट्रीय तेंग सु डो कोरियन कराटे स्पर्धेत नंदुरबारच्या खेळाडूंची घवघवीत कामगिरी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या 12 व्या राष्ट्रीय तेंग सु डो कोरियन कराटे स्पर्धेत महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याच्या खेळाडूंनी उल्लेखनीय यश संपादन करत जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला आहे. या राष्ट्रीय स्पर्धेत नंदुरबार जिल्ह्यातील नऊ खेळाडूंनी सहभाग नोंदवून दमदार कामगिरी केली.
काथे व कुमिते या दोन प्रकारांमध्ये खेळाडूंनी 1 सुवर्ण, 3 रौप्य व 5 कांस्य पदकांची कमाई करत एकूण 9 पदकांवर आपले नाव कोरले.
पदक विजेते खेळाडू मुलींच्या गटात 14 वर्षे वयोगट
अक्षदा दिनेश बैसाणे (37 किलो) सुवर्णपदक
मोक्षदा दिनेश पवार (45 किलो) रौप्यपदक
हर्षिता योसफ वळवी (57 किलो) कांस्यपदक
18 वर्षे वयोगट
सिद्धी अंबालाल पटेल (58 किलो) रौप्यपदक
रुचिता प्रवीण पाटील (47 किलो) कांस्यपदक
मुलांच्या गटात
11 वर्षे वयोगट
खुशराज अनिल सोनवणे (41 किलो) कांस्यपदक
मिर्झा रजीन अमीन बेग (35 किलो) कांस्यपदक
निखिल विनोद पाटील (51 किलो) रौप्यपदक
18 वर्षे वयोगट
शेख जैन अतिक अहमद (40 किलो) रौप्यपदक
या यशस्वी खेळाडूंना नंदुरबार शिवसेना जिल्हाप्रमुख रामभैय्या रघुवंशी यांच्या शुभहस्ते पदक व प्रमाणपत्रे प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या खेळाडूंना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष व सचिव रॉकी डिसोजा व मोहिते, नाशिक जिल्हा प्रमुख संभाजी अहिराव, तसेच दिल्ली तेंग सु डो कोरियन कराटे प्रमुख देवेंद्र गौर व नंदुरबार जिल्हा तेंग सु डो कोरियन कराटे संघटनेचे सचिव आणि प्रशिक्षक डॉ. दिनेश बैसाणे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
नंदुरबार जिल्ह्याच्या या नेत्रदीपक यशाबद्दल सर्व स्तरातून खेळाडूंचे अभिनंदन होत आहे.



