*प्रभाग 5 मधील रस्ता डांबरीकरण कामाचे शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*प्रभाग 5 मधील रस्ता डांबरीकरण कामाचे शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन*
*प्रभाग 5 मधील रस्ता डांबरीकरण कामाचे शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शहरातील प्रभाग क्रमांक 5 मधील रस्ता डांबरीकरण करण्याच्या कामाचे भूमिपूजन शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. रस्ता डांबरीकरणामुळे परिसरातील नागरिकांची सोय होणार आहे. नंदुरबार नगरपरिषदेचा माध्यमातून शनिवार दि.24 रोजी सायंकाळी 5 वाजता दादावाडी समोरील पी.के अण्णा पाटील बँक पासून जैन मंदिर तसेच महावीर कॉलनी मधील रस्ता डांबरीकरण करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन शनिवारी शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बांधकाम सभापती देवेंद्र जैन, शिक्षण सभापती भावना गुरव, नगरसेविका भावना पटेल, बाजार समिती संचालक गिरीश जैन, जितेंद्र मराठे, विनोद जैन, मनीष बाफना, जनक जैन, हितेश जैन, तौफिक खान, देवा भरवड, सतीश शाह, विनोद ताटेड, हिरालाल सोनी, उमेश देसरडा, भैया मराठे, जय शाह, शाहिद पठाण आदी उपस्थित होते.