*बामखेडा महाविद्यालयात संगणक साक्षरता प्रशिक्षण संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*बामखेडा महाविद्यालयात संगणक साक्षरता प्रशिक्षण संपन्न*
*बामखेडा महाविद्यालयात संगणक साक्षरता प्रशिक्षण संपन्न*
शहादा(प्रतिनिधी):- बामखेडा महाविद्यालयात संगणक साक्षरता प्रशिक्षण संपन्न ग्रामविकास संस्थेच्या कला व विज्ञान महाविद्यालय, बामखेडे आणि महाराष्ट्र राज्य प्राध्यापक विकास अकादमी (MSFDA), पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक आठवड्याचा संगणक साक्षरता प्रशिक्षण (FDP) कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला. या प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप कवीयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता प्राचार्य डॉ. एस. एस. राजपूत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
समारोप प्रसंगी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. एस. एस. राजपूत यांनी सांगितले की, नव्या शिक्षण धोरणात संगणक साक्षरता ही केवळ आवश्यक नसून अत्यावश्यक आहे. कारण नव्या अल्फा पिढीपर्यंत ज्ञान पोहोचविण्यासाठी संगणकीय माध्यमांचा प्रभावी वापर अपरिहार्य ठरणार आहे. या प्रसंगी महाविद्यालयातील प्रा अनिल गोसावी व त्यांचे सहकारी डॉ. संदीप लक्ष्मण कोतकर. यांच्या 'आंतराष्ट्रीय व्यवसाय व्यवस्थापनाची ओळख' या काॅमर्स शाखेसाठीच्या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील यांनी प्रशिक्षणार्थी प्राध्यापकांना उद्देशून, प्रशिक्षणातून प्राप्त झालेले ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत झिरपले पाहिजे, असे आवाहन केले.
एमएसएफडीएचे कोर्स समन्वयक सुरज बाबर यांनी महाराष्ट्र राज्य प्राध्यापक विकास अकादमीच्या विविध प्रशिक्षण उपक्रमांची माहिती दिली. यावेळी प्रशिक्षणार्थी प्रा. तुषार भांडारकर व प्रा. जगताप यांनी आपल्या मनोगतातून प्रशिक्षणाबाबत समाधान व्यक्त केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. डॉ. योगेश पाटील यांनी केले. या प्रसंगी एमएसएफडीएचे भार्गव वळंजु तसेच प्रशिक्षक डॉ. प्रतिक धमाल यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी विविध महाविद्यालयांमधून आलेले एकूण 37 प्राध्यापक उपस्थित होते.



