*नंदूरबार जिल्ह्यासाठी 4000 कोटी रुपयांच्या सर्वात मोठ्या औद्योगिक गुंतवणुकीचा करार, दावोस येथे यशस्वीपणे पार-महामंत्री विजय चौधरी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदूरबार जिल्ह्यासाठी 4000 कोटी रुपयांच्या सर्वात मोठ्या औद्योगिक गुंतवणुकीचा करार, दावोस येथे यशस्वीपणे पार-महामंत्री विजय चौधरी*
*नंदूरबार जिल्ह्यासाठी 4000 कोटी रुपयांच्या सर्वात मोठ्या औद्योगिक गुंतवणुकीचा करार, दावोस येथे यशस्वीपणे पार-महामंत्री विजय चौधरी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली नंदुरबार जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी ऐतिहासिक पाऊल भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांची माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक टप्पा गाठला गेला आहे. 1960 नंतर प्रथमच जिल्ह्यासाठी 4000 कोटी रुपयांच्या सर्वात मोठ्या औद्योगिक गुंतवणुकीचा करार दावोस येथे यशस्वीपणे पार पडला असून, ही गुंतवणूक नंदुरबारच्या आर्थिक, सामाजिक व औद्योगिक प्रगतीसाठी मैलाचा दगड ठरणार आहे. असे विजय चौधरी यांनी म्हटले आहे.
दीर्घकाळापासून मागासलेला, आदिवासीबहुल आणि विकासाच्या मुख्य प्रवाहापासून काहीसा दूर राहिलेला नंदुरबार जिल्हा आता सर्वांगीण विकासाच्या नकाशावर पुढे येत आहे. या ऐतिहासिक गुंतवणुकीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार असून स्थानिक युवक- युवतींना रोजगाराच्या नव्या व शाश्वत संधी उपलब्ध होणार आहेत. यासोबतच पूरक उद्योग, लघुउद्योग, वाहतूक व्यवस्था, पायाभूत सुविधा तसेच सेवा क्षेत्रालाही मोठी चालना मिळणार आहे. विजय चौधरी म्हणाले की, या महत्त्वपूर्ण करारामुळे नंदुरबार जिल्ह्याच्या आर्थिक रचनेत सकारात्मक व दीर्घकालीन बदल घडून येणार आहेत. स्थानिक शेतकरी, लघुउद्योजक, व्यापारी तसेच सामान्य नागरिकांना या गुंतवणुकीचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष लाभ होणार आहे. जिल्ह्यातील जीवनमान उंचावण्यासोबतच रोजगाराच्या संधी वाढल्यामुळे स्थलांतराचे प्रमाण कमी होण्यासही यामुळे निश्चितच मदत होईल. ही ऐतिहासिक गुंतवणूक महाराष्ट्र राज्याचे यशस्वी नेतृत्व, सक्षम प्रशासन आणि दूरदृष्टीपूर्ण उद्योगपूरक धोरणांचे फलित आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ठोस निर्णयक्षमतेमुळे आणि विकासाभिमुख धोरणांमुळेच जागतिक स्तरावर महाराष्ट्रावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. दावोस येथे झालेला हा करार म्हणजे राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांचा प्रभावी पुरावा आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी उचललेले हे ऐतिहासिक पाऊल भविष्यातील प्रगतीचा मजबूत पाया ठरणार आहे. या महत्त्वपूर्ण निर्णय व दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी समस्त जिल्हावासियांच्या वतीने मनःपूर्वक आभार मानले.
त्यांच्या सक्षम नेतृत्वाखाली नंदुरबार जिल्हा निश्चितच विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचेल, असा ठाम विश्वास भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी व्यक्त केला आहे.



