*घरकुल मंजूर होऊनही नऊ वर्षे प्रतिक्षा,वेरवलीतील निराधार, विधवा महिलेचा प्रजासत्ताकदिनी उपोषणाचा इशारा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*घरकुल मंजूर होऊनही नऊ वर्षे प्रतिक्षा,वेरवलीतील निराधार, विधवा महिलेचा प्रजासत्ताकदिनी उपोषणाचा इशारा*
*घरकुल मंजूर होऊनही नऊ वर्षे प्रतिक्षा,वेरवलीतील निराधार, विधवा महिलेचा प्रजासत्ताकदिनी उपोषणाचा इशारा*
लांजा(प्रतिनिधी):-तालुक्यातील एका निराधार विधवेला वेरवली, गावच्या तंटामुक्त समितीच्या सभेत सर्वानुमते घेतलेल्या निर्णयानुसार घर बांधून देण्यास तब्ब्ल नऊ वर्षे वाट पहायला लावून घर बांधून दिले नाही, म्हणून मुबईत मोलमजुरी करून गावात घरकुल मंजूर करून घेणाऱ्या विधवेला जवळच्या नातेवाईकांनी सम्मती न दिल्याने घोर फसवणूक झालेल्या सत्तर वर्षीय निराधार विधवा महिलेने प्रजासत्ताक दिनी उपोषणाचा इशारा दिला आहे. जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनामध्ये निराधार विधवा महिला दीपाली दीपक डोळस यांनी आपली दयनीय व्यथा कथन करुन प्रशासनाला खडा सवाल व्यक्त केला आहे. गरीब निराधार अबलेला जगण्याचा हक्क नाही काय?माझी व्यथा सुटणारच नाही का? कायदा गरीबाच रक्षणच करणार नाही काय? प्रशासना समोर माझी भूमिका मला लेखी स्पष्ट मांडता येत नव्हती हिच माझी चूक होती का?असा प्रश्न केला आहे कायदा दोन नंबर धंदे अवैध दारू धंदे, अवैध खैर विक्री करणाऱ्या माझ्या शेजारी, आणि नातेवाईकांना पाठीशी घालून मलाच मरण यातना देत आहे असा संताप व्यक्त केला असून, सगळ्यांनी मिळून शडयंत्र रचले आहे मला कोणीही आधार नाही मला माझी खरी बाजू असताना मांडता आली नाही, मीं तहसिलदार, गटविकास अधिकारी, लांजा पोलीस, मुबईत महिला आयोग यांच्याकडे वणवणं फिरत आहे न्यायासाठी लढतेय पण मीच या सगळ्यांना त्रास देत आहे अशी माझी उलटी प्रतिमा करुन, मला दोषी ठरवलं जात आहे माझा दोष काय?असा प्रश्न उपस्थित करून आपला विश्वासघात कसा केला गेला यांची खंत विस्तृतपणे निवेदनामध्ये व्यक्त केली आहे. या महिलेने तीला विरोध करणाऱ्या तिच्या विरोधक नातेवाईकांना घर बांधायला मात्र मीं यांच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवला सन 2014 मध्ये बॉण्ड पेपरवर सम्मती करून दिली होती, मात्र मला फसविले गेले. असे निवेदनात म्हटले आहे सर्व नातेवाईकाकडून आपला छळ केला जात असल्यामुळे मला न्यायासाठी व घरकुलच्या सम्मती साठी उपोषणास बसावे लागेल असा इशारा दिला आहे.



