*धुळे जिल्ह्यातील दिशा कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*धुळे जिल्ह्यातील दिशा कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न*
*धुळे जिल्ह्यातील दिशा कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न*
धुळे(प्रतिनिधी):-धुळे जिल्ह्यातील दिशा कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्ष म्हणून खासदार डॉ. शोभा बच्छाव यांच्या मार्गदर्शन असून सह-अध्यक्ष म्हणून नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे खासदार एडवोकेट गोवाल पाडवी उपस्थित होते, सुमारे सहा तास चाललेल्या बैठकीत राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे, बँकिंग सुविधा, PMGSY रस्ते, MSEDCL व वीज समस्यांपासून ते ATMA, UMED, लघु सिंचनाच्या (Minor Irrigation) समस्या आणि जलजीवन मिशनशी संबंधित मुद्द्यांपर्यंत व्यापक चर्चा झाली. या बैठकीत केंद्र सरकाराच्या योजनांच्या अंमलबजावणीतील अडचणी, राज्य व जिल्हा पातळीवरील समन्वयाचे प्रश्न व जिल्हा परिषदेच्या काही बाबींचाही सखोल आढावा घेण्यात आला. या सर्व समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी आणि धुळे जनतेच्या सेवेत तत्पर राहण्यासाठी आम्ही संबंधित कार्यालयांनी तातडीने कार्यवाही करावी ही अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.