*श्रीमती प्यारीबाई ओसवाल प्राथमिक विद्यामंदिरात बालआनंद मेळावा, पाककला स्पर्धा व हळदी कुंकवाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*श्रीमती प्यारीबाई ओसवाल प्राथमिक विद्यामंदिरात बालआनंद मेळावा, पाककला स्पर्धा व हळदी कुंकवाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न*
*श्रीमती प्यारीबाई ओसवाल प्राथमिक विद्यामंदिरात बालआनंद मेळावा, पाककला स्पर्धा व हळदी कुंकवाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न*
नंदूरबार(प्रतिनिधी):-येथील वेस्ट खान्देश भगिनी सेवा मंडळ धुळे संचलित, श्रीमती प्यारीबाई ओसवाल प्राथमिक विद्यामंदिरात बालआनंद मेळावा व पाककला स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक राहुल मोरे तर प्रमुख पाहुणे म्हणून गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक प्रा.भाग्यश्री अनिल कुलकर्णी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कुमुद शिंदे यांनी उपस्थिताना हळदी कुंकवाच्या कार्यक्रम व पाककला स्पर्धेविषयी थोडक्यात माहिती देऊन मनोगत व्यक्त केले. त्यानंतर आलेल्या प्रमुख पाहुण्या भाग्यश्री कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना व माता-भगिनींना सात्विक आहार याविषयी मार्गदर्शन करून माता- भगिनींना विद्यार्थ्यांच्या डबा कसा असावा? याबाबत माहिती दिली. त्यानंतर आलेल्या मान्यवरांच्या हस्ते पाककला व बालआनंद मेळाव्याचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. बालआनंद मेळाव्यात माता भगिनी यांनी केलेल्या विविध पौष्टिक व सात्विक पदार्थांची रंगत दिसून आली. त्यात 69 माता-भगिनींनी सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी व आलेल्या प्रमुख पाहुण्यांनी ठेवलेला पदार्थांचा येथेच्छ आस्वाद घेऊन मनसोक्त आनंद लुटला. प्रसंगी बऱ्याच माता- भगिनींनी ऑनलाईन पेमेंट साठी क्यूआर कोड ठेवल्याने विद्यार्थ्यांना त्याची देखील माहिती झाली. त्यानंतर माता भगिनींनी ठेवलेल्या पदार्थांचे परीक्षण करण्यात आले. त्यात-
प्रथम क्रमांक - अर्चना भिकन सूळ 2 री अ, द्वितीय क्रमांक प्रियंका सतीश खेमनार 2 री ब, तृतीय क्रमांक आरती संदीप माळी 3 री अ, चतुर्थ क्रमांक विद्या शरद वाढणे 1 ली अ,
यांचे क्रमांक आले व कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. तसेच हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने माता भगिनी उपस्थित झाल्या. त्यांचं शाळेतील सहकारी भगिनींनी स्वागत केले. हळदी कुंकू करून भेटवस्तू दिली व खेळीमेळीच्या वातावरणात कार्यक्रम साजरा झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपश्री सोनार तर आभार सुनीता सूर्यवंशी यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन माता भगिनी संघाच्या प्रमुख कुमुद शिंदे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.



