*‘आंतरराष्ट्रीय व्यवसाय व्यवस्थापनाची ओळख’या पुस्तकाचे बामखेडे महाविद्यालयात प्रकाशन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*‘आंतरराष्ट्रीय व्यवसाय व्यवस्थापनाची ओळख’या पुस्तकाचे बामखेडे महाविद्यालयात प्रकाशन*
*‘आंतरराष्ट्रीय व्यवसाय व्यवस्थापनाची ओळख’या पुस्तकाचे बामखेडे महाविद्यालयात प्रकाशन*
शहादा(प्रतिनिधी):-ग्रामविकास संस्थेचे कला व विज्ञान महाविद्यालयात द्वितीय वर्ष वाणिज्य विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या ‘आंतरराष्ट्रीय व्यवसाय व्यवस्थापनाची ओळख’ (Introduction to International Business Management) या नवीन पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते उत्साहात झाले.हे पुस्तक डॉ. संदीप लक्ष्मण कोतकर आणि प्रा. अनिल माधवगीर गोसावी यांनी या पुस्तकाचे सहलेखन केले आहे. नवीन शैक्षणिक धोरण (NEP 2020) नुसार तयार करण्यात आले असून, पुस्तक अत्यंत मार्गदर्शक ठरणार असून. 'प्राईम पब्लिशिंग हाऊस' जळगाव यांनी प्रकाशन केले आहे. या कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी लेखकांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. जागतिक बाजारपेठ आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातील बदलत्या प्रवाहांची सोप्या भाषेत मांडणी केल्यामुळे हे पुस्तक विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी नक्कीच मदत करेल, असा विश्वास यावेळी प्रा .अनिल गोसावी यांनी व्यक्त केला. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे अधिष्ठाता व व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. एस. एस. राजपूत, ग्रामविकास संस्था बामखेडा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच.एम. पाटील, एम. एस. एफ. डी. ए. पुणे येथील केंद्र प्रमुख सुरजकुमार बाबर,
एम. एस. एफ. डी. ए. चे व्यवस्थापक, आउटसोर्सिंग आणि कम्युनिकेशन्स व्यवस्थापक प्रतीक धमाल. व एम. एस. एफ. डी. ए. पुणे येथील सेंटर हेड, सेंटर फॉर इनोव्हेशन अँड अत्याधुनिक तंत्रज्ञ भार्गव वलंजू, (कार्यक्रम समन्वयक) पुणे. यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉ. के. एच. चौधरी उपाध्यक्ष पी. बी. पटेल. संस्थेचे सचिव बी. व्हि. चौधरी यांनी प्रा. गोसावी यांचे अभिनंदन व कौतुक केले. सदर पुस्तक प्रकाशन वेळी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर सहकारी मित्र उपस्थित होते. सर्वांनी लेखकांचे अभिनंदन व कौतुक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. योगेश पाटील यांनी केले. आणि प्रा. मोहन निकुंभे यांनी आभार व्यक्त केले.



