*समुत्कर्ष शैक्षणिक व बहूउद्देशिय संस्था, नंदुरबारतर्फे हळदी कुंकु निमित्त जागर मातृ शक्तीचा कार्यक्रम संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*समुत्कर्ष शैक्षणिक व बहूउद्देशिय संस्था, नंदुरबारतर्फे हळदी कुंकु निमित्त जागर मातृ शक्तीचा कार्यक्रम संपन्न*
*समुत्कर्ष शैक्षणिक व बहूउद्देशिय संस्था, नंदुरबारतर्फे हळदी कुंकु निमित्त जागर मातृ शक्तीचा कार्यक्रम संपन्न*
नंदूरबार(प्रतिनिधी):-समुत्कर्ष शैक्षणिक व बहूउद्देशिय संस्था, नंदुरबारतर्फे हळदी कुंकु निमित्त जागर मातृ शक्तीचा कार्यक्रम गिरीविहार वाडी येथे संपन्न.कार्यक्रमाच्या अध्यक्षा नंदुरबार नगरीच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा सौ. रत्ना रघुवंशी होत्या तर प्रमुख वक्त्या तसेच विद्याभारतीच्या विभागीय अध्यक्षा सौ. मुक्ता पाटील या होत्या तसेच इतर मान्यवर महिला बाल कल्याण सभापती सौ. शितल वसावे, नगरसेविका सौ. मनकुवंर गिरासे, नगरसेविका सौ. हर्षदा पाटील, दामिनी पथकच्या सौ. ज्योती पाटील, सौ. प्रिती जांबिलिया, अड् . गीतांजली वळवी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला 400 हून अधिक महिला उपस्थित होत्या. तसेच कार्यक्रमांत वीरमातांबद्दल विविध प्रश्नमंजूषा आणि सजीव वक्तृत्वांचेही सादरीकरण करण्यात आले.
कार्यक्रमांत आपल्या अध्यक्षीय भाषणांत सौ. रत्ना रघुवंशी यांनी भारतीय सणांचे महत्त्व सांगतांना कुटुंबातील संस्कार राष्ट्र घडविण्यासाठी महत्त्वाचे असल्याचे नमूद केले, तसेच त्यात आईची भूमिका ही अत्यंत महत्वाची असल्याचे नमूद केले, तसेच सौ. मुक्ता पाटील यांनी यशस्वी महिला तसेच महान व्यक्तींच्या महानतेला आईची भूमिका किती महत्त्वाची होती याविषयी नमूद केले, दामिनी पथकच्या सौ. ज्योती पाटील यांनी महिला सुरक्षेची माहिती दिली, तर एड् गीतांजली वळवी यांनी महिसांचे हक्क आणि अधिकारांविषयी विविध कायद्यांबद्दल माहिती दिली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. सपना श्रॉफ आणि सौ. विजयता पाटील यांनी केले तर प्रास्ताविक सौ. सारिका पाटील यांनी केले, संस्थेतर्फे चालविल्या जाणा-या विविध उपक्रमांची माहिती सौ. पूनम माळी, सौ. अश्विनी पाठक, सौ. सारिका पाटील यांनी दिली तर आभार सौ. हेमलता महाजन यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती पूजा बजाज, प्रिया सरकटे, अंजली माळी, मिनल चव्हाण, सौ. चंदा शर्मा, सौ. संगिता डाबी, सौ. मिनाक्षी देसले, सौ. नम्रता राजपूत, सौ. अर्चना मराठे, सौ. रिना पाटील, सौ. मेघाली जोशी परिश्रम घेतले.



