*माय भारत केंद्र व जी. टी. पाटील महाविद्यालयाच्या वतीने मतदार दिनानिमित्त पदयात्रेचे आयोजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*माय भारत केंद्र व जी. टी. पाटील महाविद्यालयाच्या वतीने मतदार दिनानिमित्त पदयात्रेचे आयोजन*
*माय भारत केंद्र व जी. टी. पाटील महाविद्यालयाच्या वतीने मतदार दिनानिमित्त पदयात्रेचे आयोजन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-भारत सरकारच्या माय भारत केंद्र, नंदुरबार व नंदुरबार येथील जी. टी. पाटील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व राष्ट्रीय छात्र सेना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जनजागृती पदयात्रेचे आयोजन करण्यात आले.
या पदयात्रेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य तथा विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. एम. जे. रघुवंशी व माय भारतचे युवा अधिकारी भूषण पाटील यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते नविन मतदारांना माय भारतचे बॅच देऊन गौरविण्यात आले. प्राचार्य डॉ. एम. जे. रघुवंशी यांनी मार्गदर्शन करताना लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच मतदार जनजागृतीसाठी स्वयंसेवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
युवा अधिकारी भूषण पाटील यांनी पदयात्रेस शुभेच्छा देत मतदार जागृतीसाठी अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली.
यावेळी प्रा. डॉ. एस. बी. वायसे, प्रा. एस. जे. साक्रीकर, प्रा. अंकुश रघुवंशी, डॉ. दिनेश देवरे, डॉ. डी. डी. गावीत यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. माधव कदम यांनी उपस्थितांना मतदार दिनाची शपथ दिली. ही पदयात्रा महाविद्यालय परिसरातून बस स्थानकापर्यंत काढण्यात आली.
पदयात्रेचे संचालन डॉ. व्ही. झेड. चौधरी, डॉ. सुलतान पवार, डॉ. मनोज शेवाळे व प्रा. जितेंद्र पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी माय भारतचे गणेश ईशी, प्रा. हर्षबोध बैसाणे व प्रा. एम. एस. पाटील प्रा. माधव वाघमारे यांनी विशेष परिश्रम घेतले.



