*डी आर हायस्कूल चा 85 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*डी आर हायस्कूल चा 85 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा*
*डी आर हायस्कूल चा 85 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूलचा 85 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे चेअरमन नरेंद्र सराफ, सचिव प्रशांत पाठक, मुख्याध्यापक मोहन अहिरराव, उपमुख्याध्यापक श्रीराम मोडक, पर्यवेक्षक संजय सैंदाणे, हेमंत खैरनार, तसेच प्रमुख अतिथी म्हणून चार्टर्ड अकाउंटंट कचरू शर्मा, डॉक्टर विजय पटेल, आनंद रघुवंशी, अजित रघुवंशी, ॲड मोसम चौधरी हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन करून करण्यात आली. त्यानंतर संस्थेचे सर्व माजी संस्थापक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.
प्रमुख अतिथी डॉ विजय पटेल यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणीना उजाळा दिला व सांगितले, की विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व घडविण्यात शाळेचा खूप मोठा वाटा असतो. दुसरे अतिथी कचरू शर्मा यांनी कठीण परिश्रमा शिवाय पर्याय नाही, तसेच विद्यार्थ्यांनी मोबाईल चा अतिरेक टाळावा असे मार्गदर्शन केले.
संस्थेचे सचिव प्रशांत पाठक यांनी शाळेचा इतिहास विद्यार्थांसमोर मांडला. अध्यक्ष चेअरमन नरेंद्र सराफ यांनी विद्यार्थ्यांना आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर शिस्त पाळा व मन लावून अभ्यास करा असे मार्गदर्शन केले.
शाळेच्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांच्या हस्ते केक कापण्यात आला. तसेच सर्व विद्यार्थ्यांना केक वाटप करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल पाटील यांनी केले तर प्रास्ताविक उपमुख्याध्यापक श्रीराम मोडक व आभार पर्यवेक्षक हेमंत खैरनार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.



