*नंदुरबार पालिकेच्या विरोधी पक्षातील भाजपाचे विरोधी पक्ष नेत्यांसह गटनेते तसेच सदस्यांनी,मालमत्ता करावरील सुटबाबत निवेदन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार पालिकेच्या विरोधी पक्षातील भाजपाचे विरोधी पक्ष नेत्यांसह गटनेते तसेच सदस्यांनी,मालमत्ता करावरील सुटबाबत निवेदन*
*नंदुरबार पालिकेच्या विरोधी पक्षातील भाजपाचे विरोधी पक्ष नेत्यांसह गटनेते तसेच सदस्यांनी,मालमत्ता करावरील सुटबाबत निवेदन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्याकडे नंदुरबार पालिकेच्या विरोधी पक्षातील भाजपाचे विरोधी पक्ष नेत्यांसह गटनेते तसेच सदस्यांनी, मालमत्ता करावरील सुटबाबत निवेदन दिले आहे. नंदुरबार नगरपालिकेतील विरोधी पक्षातील भाजपच्या विरोधी पक्ष नेत्यांसह गटनेते व पालिकेच्या विरोधी पक्षातील भाजपच्या सदस्यांतर्फे मुख्याधिकारी राहुल वाघ यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नंदुरबार नगर परिषदेच्या वतीने सध्या मालमत्ता कराची वसुली केली जात आहे, यामध्ये जे करदाते मुदतीच्या आत कराचा भरणा करत आहे, त्यांनी त्याच्या मालमत्ता करात काही प्रमाणात सुट देण्यात यावी, यामुळे मालमत्ता वसुलीलाही चालना मिळेल. सोबतच थकीत मालमत्ता करावर दर महिन्याला व्याज व दंडाची रक्कम आकारणी करण्यात येत आहे. ती त्वरीत थांबवून महाराष्ट्र शासन निर्णयानुसार सोलर, जलपुर्नभरण, ग्रिन बिल्डींग अशा संकल्पना राबविणाऱ्या मालमत्तांना करात सवलत लागु करण्यात यावी. या सर्व योजनांमुळे मालमत्ता कर वसुली मोहीमेल काहीसे पाठबळ मिळून थकीत मालमत्ता देखील भरणा होईल अशी मागणी पालिकेतील भाजपाचे विरोधी पक्षानेता हिरालाल चौधरी यांच्यासह भाजपचे विरोधी पक्ष्याचे गटनेते आनंद माळी, चारुदत्त कळवणकर, पंकज चौधरी सरिका माळी, नीता मराठे, शोभा चौधरी, रेखा चौधरी, सुषमा गावित यांनी पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्याकडे देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.



