*30 जानेवारीला पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा-मंगेश वाघ*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*30 जानेवारीला पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा-मंगेश वाघ*
*30 जानेवारीला पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा-मंगेश वाघ*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, आदिवासी सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ, संचलित महाराज ज.पो. वळवी कला, वाणिज्य आणि वि.कृ.कुलकर्णी विज्ञान महाविद्यालय, धडगांव यांच्या संयुक्त विद्यमाने 30 जानेवारी, 2026 रोजी सकाळी 10 वाजता महाराज ज. पो. वळवी कला, वाणिज्य आणि वि. कृ.कुलकर्णी विज्ञान महाविद्यालय, धडगांव येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त मंगेश वाघ यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे. या रोजगार मेळाव्यात विविध नामांकित कंपन्या सहभागी होणार असून, एकूण 680 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. सहभागी होणाऱ्या प्रमुख कंपन्यांमध्ये बांसवाडा गारमेंट दमन (गुजरात), हिताची जळगाव, बजाज ऑटो लि. पुणे, टाटा मोटार्स पुणे, सुप्रीम इक्किपमेंटस प्रा. लि. नाशिक, बॉस्च प्रा.लि. नाशिक, ब्लु एनर्जी पुणे, नवभारत फर्टिलायजर धुळे, गोविंद एच.आर. सर्विसेस नंदुरबार व श्रीकांत एंटरप्रायझेस, अंबड इत्यादींचा समावेश आहे. बेरोजगार उमेदवारांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त वाघ यांनी या शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.



